ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा स्टारर 'हेड्स ऑफ स्टेट'चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा तडका... - HEADS OF STATE TRAILER OUT

'हेड्स ऑफ स्टेट'च्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा MI6 एजंटच्या भूमिकेत धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांचीही झलक आहे.

heads of state trailer out
'हेड्स ऑफ स्टेट'चा ट्रेलर प्रदर्शित ('हेड्स ऑफ स्टेट'चा ट्रेलर प्रदर्शित (Trailer Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : June 5, 2025 at 11:37 AM IST

1 Min Read

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आगामी अ‍ॅक्शन-कॉमेडी 'हेड्स ऑफ स्टेट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांका जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे, ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते प्रियांका चोप्रा जोनासच्या MI6 एजंट नोएल बिसेटच्या भूमिकेबद्दल कौतुक करत आहेत. इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्याबरोबर काम करत, इल्या नैशुलर दिग्दर्शित या चित्रपटात देसी गर्ल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

ट्रेलर कसा आहे : २ मिनिट ४६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान सॅम क्लार्क (एल्बा) आणि अमेरिकेचे अध्यक्ष विल डेरिंगर (सीना) यांची ओळख करून दिली आहे, जे एका अडचणीत अडकले आहेत. एक परदेशी शत्रू त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येतात. MI6 एजेंट नोएल बिसेट (प्रियांका) ही देखील ट्रेलरमध्ये दिसते, जिचे ध्येय त्यांचे संरक्षण करणे आणि जगात अशांतता पसरवू शकणाऱ्या कटाला रोखण्याची असते. 'हेड्स ऑफ स्टेट'च्या ट्रेलरमध्ये ९०च्या दशकातील विनोदी चित्रपटांची आठवण करून देणारे उच्च दर्जाचे अ‍ॅक्शन आणि मजेदार एक-लाइनर आहेत.

प्रियांका चोप्राचं केलं चाहत्यांनी कौतुक : या चित्रपटामध्ये पॅडी कॉन्सिडाइन, कार्ला गुगिनो, जॅक क्वेड, स्टीफन रूट आणि सारा नाईल्स हे देखील स्टार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते प्रियांका आणि तिच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक करत आहेत. एक्सवर एका यूजरनं लिहिलं, 'प्रियांका चोप्रा जोनास, खूप अभिमानी, खूप उत्साहित दिसत आहे, मी वाट पाहू शकत नाही.' दुसऱ्या एका चाहत्यांनी प्रियांकाबद्दल लिहिलं, 'ती क्वीन आहे' आणखी एकानं लिहिलं, 'प्रियांकानं खरोखरच उत्कृष्ट अभिनय केला आहे.' याशिवाय अनेकांनी असेही म्हटलं आहे की, ट्रेलरनं त्यांना 'क्वांटिको'च्या दिवसांची आठवण करून दिली. ट्रेलर रिलीज करताना प्रियांका चोप्रानं लिहिलं, 'कीप काम एंड कैरी ऑन', 'हेड्स ऑफ स्टेट' २ जुलै रोजी येत आहे.' प्रियांका चोप्रा, जॉन सीना आणि इद्रिस एल्बा अभिनीत अ‍ॅक्शन कॉमेडी 'हेड्स ऑफ स्टेट' हा प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राच्या नमस्तेनं भारताचा अभिमान उंचवला, मेट गाला २०२५च्या प्रतिष्ठीत कार्पेटवर अवतरली देसी गर्ल
  2. प्रियांका चोप्रानं ऐतिहासिक वेव्हज समिट २०२५ उपक्रमाबद्दल पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक, व्हिडिओ व्हायरल
  3. 'क्रिश 4'च्या घोषणेनंतर हृतिक रोशननं प्रियांका चोप्राची घेतली भेट, स्टारचा व्हिडिओ व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.