Bihar Election Results 2025

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं करवा चौथची सुरू केली तयारी, फोटो शेअर करून चाहत्यांना दाखवली झलक...

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं करवा चौथची तयारी सुरू केली आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या तयारीची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा (प्रियांका चोप्राची मेहंदी (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : October 9, 2025 at 5:19 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिचा पती हॉलिवूड गायक निक जोनासबरोबर करवा चौथ साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या व्यग्र वेळापत्रकातून देसी गर्लनं या सणाची तयारी सुरू केली आहे. आज, ९ ऑक्टोबर रोजी, तिनं सोशल मीडियावर तिच्या तयारीची एक झलक शेअर केली आहे. दरम्यान प्रियांका चोप्रा दरवर्षी अमेरिकेत तिच्या कुटुंबासह करवा चौथ साजरा करत असते. गुरुवारी करवा चौथच्या तयारीची एक झलक शेअर केल्यानंतर प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रियांका चोप्रानं केली करवा चौथची तयारी : दरम्यान शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ग्लोबल स्टार मेहंदीनं सजवलेला तिचा तळ हात दाखवताना दिसत आहे. डिझाइनमध्ये निकचे नाव निकोलस हिंदीमध्ये लिहिलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं कॅप्शन लिहिलं आहे, 'शिरीन चरणिया, या करवा चौथमध्ये काम करत आहे.' प्रियांकाचे दोन्ही हात मेहंदीच्या डिझाइनने सजवलेले आहेत, तसेच तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या पुढील स्लाईडमध्ये, प्रियांकानं तिची मुलगी मालती मेरीच्या हातांसोबत तिचे हात दाखवणारा एक फोटो पोस्ट केला आहे. आता उद्या १० ऑक्टोबर रोजी देशभरात करवा चौथ हा सण साजरा केला जाईल, हा दिवस प्रत्येक पती आणि पत्नीसाठी खूप विशेष असतो.

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : दरम्यान प्रियांका आणि निक यांनी डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू विधींनुसार लग्न केलं. जानेवारी २०२२ मध्ये, या जोडप्यानं सरोगसीद्वारे त्यांची मुलगी मालतीचे स्वागत केलं. कामाच्या बाबतीत, प्रियांका सध्या एसएस राजामौली यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्यामध्ये महेश बाबू आणि पृथ्वीराज देखील आहेत. या बहुप्रतीक्षित प्रोजेक्टचा फर्स्ट लूक नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, तिला 'क्रिश ४'साठी साइन करण्यात आले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हृतिक रोशन करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्राला 'कमीने' चित्रपट कसा मिळाला, १६ वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा...
  2. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासनं लंडनच्या रस्त्यावर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल...
  3. बहीण मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर 'देसी गर्ल' प्रियांकानं शेअर केली भावूक पोस्ट, वाचा सविस्तर