ETV Bharat / entertainment

श्रीनगरमध्ये 'ग्राऊंड झिरो' चित्रपटाचं होणार रेड कार्पेट प्रीमियर... - PREMIERE OF GROUND ZERO MOVIE

तब्बल 38 वर्षांनंतर श्रीनगरमध्ये एका चित्रपटाचं प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाच नाव 'ग्राऊंड झिरो' आहे.

Ground zero movie
'ग्राऊंड झिरो' चित्रपट (Ground zero movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 14, 2025 at 5:07 PM IST

1 Min Read

मुंबई - गेली अनेक दशके काश्मीर खोरे दहशदवादाच्या विळख्यात सापडलेले होते. आजही तिथे संपूर्ण शांतता नसली तरी बाहेरील राज्यांतून लोकांची या राज्यात ये जा सुरु झाली आहे. एकेकाळी श्रीनगरला भारताचे नंदनवन म्हटले जायचे आणि अगणित चित्रपटांचे शूटिंग येथील रम्य ठिकाणी व्हायचे. परंतु नंतर ते पूर्णतः बंद झाले. आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी या जागेकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला लागली आहे. 'ग्राऊंड झिरो' हा काश्मीरमधील घडामोडीवर बेतलेला असून या चित्रपटाचा श्रीनगरमध्ये भव्य रेड कार्पेट येत्या १८ एप्रिल रोजी प्रीमियर होणार आहे. हा एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी असणार आहे.

श्रीनगरमध्ये 'ग्राऊंड झिरो'चं होणार प्रीमियर : श्रीनगर, काश्मीरमध्ये तब्बल ३८ वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा रेड कार्पेट प्रीमियर होणार आहे. आता हा मान मिळवणारा पहिला चित्रपट 'ग्राऊंड झिरो' ठरणार आहे. एक्सेल एंटरटेन्मेन्टच्या 'ग्राऊंड झिरो' चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी हा चित्रपट सर्वप्रथम आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवान आणि लष्करी अधिकाऱ्यांना दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक अद्वितीय अनुभव देईल असे निर्मात्यांना वाटते.

'ग्राऊंड झिरो' चित्रपटाबद्दल : 'ग्राऊंड झिरो' सत्य घटनेवर बेतलेला असून हा चित्रपट संपूर्णपणे काश्मीरमध्येच चित्रित करण्यात आला आहे, तसेच, बीएसएफनं देखील चित्रपटाला मान्यता दिली आहे. दरम्यान या घटनेच्या वेळी गाझी बाबा हा जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर आणि हरकत-उल-अन्सारचा डेप्युटी कमांडर होता. १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या भारतीय संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून तो ओळखला जातो. या चित्रपटात इमरान हाश्मी बीएसएफ कमांडंट नरेंद्रनाथ धर दुबे यांची भूमिका साकारत आहे. त्यांनी गाझी बाबाला ठार करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. ही मोहीम बीएसएफच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट मानली जाते. एक्सेल एंटरटेन्मेन्ट प्रस्तुत आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'ग्राऊंड झिरो' या चित्रपटामध्ये इमरान हाश्मीबरोबर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. इमरान हाश्मी स्टारर 'ग्राउंड झीरो' चित्रपटात सई ताम्हणकर दिसणार विशेष भूमिकेत, वाचा सविस्तर
  2. सई ताम्हणकर आणि इम्रान हाश्मी स्टारर सत्यकथेवर आधारित 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज
  3. इमरान हाश्मी - सई ताम्हणकर स्टारर 'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज, पाहा दमदार अ‍ॅक्शन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.