मुंबई - महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित अनेक चित्रपट बनविण्यात आली आहेत. आता झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित 'फुले' या हिंदी चित्रपटाचं नुकतेच ट्रेलर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहे. या चित्रपटाचं रिलीज झालेलं ट्रेलर अनेकांना आवडलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना थोर समाजसेवक म्हटले जाते. त्यांनी समाजासाठी अनेक चांगले काम केले आहेत. या चित्रपटातून या महान व्यक्तींची कहाणी समोर येईल.
सामाजिक समतेसाठी दिला लढा : महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला होता. त्यांनी ब्रिटिशकालीन भारतात मुलींसाठी पहिली शाळा निर्मित केली होती. याशिवाय त्यांनी वंचित समाज आणि शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला. या चित्रपटातून त्यांची प्रेरणादायी कहाणी आता जगासमोर येईल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजावर मोठा प्रभाव पाडला होता. या चित्रपटाची दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे.
'फुले' चित्रपटाबद्दल : या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांची भूमिका प्रतीक गांधी साकारणार आहे. तसेच, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा करणार आहे. या चित्रपटामधील भूमिकेसाठी दोघांनी खूप मेहनत घेतली आहे. 'फुले' चित्रपटामध्ये त्यांना नवीन भूमिकेत पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सुनील जैन, डॉ. राज खवारे आणि जगदीश पटेल हे आहेत. आता या चित्रपटाच्या ट्रेलर हा सोशल मीडियावर गाजत आहे. यावर कॅप्शन दिलं गेलं आहे, 'एका क्रांतीची सुरुवात होते. झी स्टुडिओज, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रॉडक्शन्स सादर करत आहेत. 'फुले! 11 एप्रिल 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये. अधिकृत ट्रेलर आत्ताच पाहा!' या पोस्टवर आता एका चाहत्यानं लिहिलं, 'हा चित्रपट जबरदस्त असणार आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'जय ज्योतीबा क्रांती.' आणखी एकानं लिहिलं, 'हा चित्रपट पाहण्यासाठी मी आतुर आहे.' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना इतिहासाबद्दल माहिती मिळेल.