ETV Bharat / entertainment

फवाद खान आणि हानिया आमिरसह पाकिस्तानी सेलिब्रिटींकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध - PAHALGAM TERROR ATTACK

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेचा पाकिस्तानी कलाकारांनीही निषेध व्यक्त केला आहे. फवाद खान, हानिया आमिर आणि मावरा होकेन यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला.

Pakistani celebrities
फवाद खान आणि हानिया आमिर ((Photo: IANS, Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 24, 2025 at 5:24 PM IST

2 Min Read

मुंबई - जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामध्ये किमान २६ जणांचा बळी गेला, यानंतर जगभरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त झाली आणि दहशतवादी कृतीचा निषेध करण्यात आला. यामध्ये फवाद खान, हानिया आमिर आणि मावरा होकेन यांच्यासह अनेक प्रमुख पाकिस्तानी सेलिब्रिटींनी हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. मंगळवारी दुपारी निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यानं संपूर्ण प्रदेश आणि त्यापलीकडेही धक्का बसला आहे.

या दुर्घटनेची बातमी समजताच पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला.

Fawad Khan's IG Story
फवाद खान ((Photo: Instagram))

अबीर गुलाल या चित्रपटावरील बंदीच्या दरम्यान फवाद खानचं विधान - अबीर गुलाल या त्याच्या आगामी बॉलिवूड चित्रपटामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता फवाद खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून शोक व्यक्त केला. "पहलगाममध्ये घटलेली भयानक हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. या भयानक घटनेतील बळींबरोबर आमच्या संवेदना आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि आरोग्य मिळावे अशी आम्ही प्रार्थना करतो," असं त्यांनी लिहिलंय.

'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संघटनेनं पाकिस्तानी कलाकांवर बंदीची आपली भूमिका मांडली. पाकिस्तानी कालाकारांवर दीर्घकाळापासून भारतात बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता आणि अशा काळात एकतेची गरज लक्षात घेऊन २०१९ मध्ये बंदीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचं FWICE नं ठरवलं आहे. परिणामी, ९ मे रोजी प्रदर्शित होणारा फवाद खान आणि वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Hania Aamir's IG Story
हानिया आमिर ((Photo: Instagram))

हानिया आमिर: "दुःखद घटना घडणं ही सर्वांसाठी एक शोकांतिकाच असते" - पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक हृदयस्पर्शी संदेश शेअर केला आहे, यामध्ये दुखःचं सार्वत्रिक असलेलं स्वरुप तिनं सांगितलंय."कुठेही दुःखद घटना घडणे ही आपल्या सर्वांसाठी एक शोकांतिकाच असते. माझे हृदय अलीकडील घटनांमुळे प्रभावित झालेल्या निष्पाप जीवांबरोबर आहे. वेदनेत, दुःखात आणि आशेमध्ये आपण एक आहोत. जेव्हा निष्पाप जीव जातात तेव्हा वेदना त्यांच्या एकट्याची नसतात - त्या आपल्या सर्वांच्या असतात. आपण कुठूनही आलो तरी, दुःखाची भाषा एकच असते. आपण नेहमीच मानवतेची निवड करुयात," असं तिनं लिहिलं.

Mawra Hocane's IG Story
मावरा होकेन ((Photo: Instagarm))
Farhan Saeed's IG Story
फरहान सईद ((Photo: Instagram))

मावरा होकेन, फरहान सईद आणि इतरांनी शोक व्यक्त केला - 'सनम तेरी कसम' हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिनं सरु ही भूमिका साकारली होती. पहलगामची घटना कळल्यानंतर तिलाही दुःख झालंय. याबद्दल शोक व्यक्त करताना तिनं लिहिलंय, "पीडित कुटुंबांबद्दल माझी मनापासून सहानुभूती आहे.. एकाविरुद्ध दहशतवादी हल्ला म्हणजे सर्वांविरुद्धचा दहशतवादी हल्ला आहे. जगाचं काय चाललंय???"

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.