श्रीनगर : पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या नरसंहारानंतर काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी पर्यटकांना शांततेचा संदेश देण्यासाठी आणि काश्मीर सुरक्षित असल्याचा विश्वास देण्यासाठी पहलगामला दाखल झाला आहे. बॉलिवूडच्या डझनभर सुपरहिट चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये पोहोचला. अतुल कुलकर्णी यानं निसर्गरम्य ठिकाणी स्थानिक काश्मिरी नागरिकांची भेट घेतली. त्यांचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काश्मीरमध्ये येऊ नये, म्हणून दहशतवाद्यांचा हल्ला : पहलगाममध्ये हल्ला झाल्यामुळे अनेक पर्यटकांनी काश्मीरमधील बुकींग रद्द केलं. मात्र अभिनेता अतुल कुलकर्णी यानं पहलगामला धाव घेत काश्मीर सुरक्षित असल्याचा पर्यटकांना विश्वास दिला. यावेळी बोलताा अतुल कुलकर्णी यांनं सांगितलं, की "पर्यटकांवरील हल्ल्याबद्दल सोशल मीडियावर लिहिण्याऐवजी किंवा बोलण्याऐवजी मी काश्मीरला भेट देण्याचा निर्णय घेतला. पहलगाममध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुकिंग रद्द करणाऱ्या पर्यटकांना आत्मविश्वास देण्याचा निर्णय घेतला. वेदनादायक हल्ल्यानंतर देशवासीयांना आणि जगाला हा संदेश देण्यासाठी काश्मीरला भेट देण्याचा निर्णय घेतला, की काश्मीर खोरे सुरक्षित आहे. तुम्ही काश्मीरला जाऊ नये, म्हणून दहशतवाद्यांनी हा नरसंहार घडवून आणला. पण काश्मीर आमचा आहे, हा देश आमचा आहे. म्हणून यायलाच हवं," असं त्यानं सांगितलं.

दहशतवादाचा पराभव करा : अनंतनागच्या पहलगाममधील बैसरन कुरणात 22 एप्रिलला 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली. यानंतर अतुल कुलकर्णी यांनी पहलगाम गाठलं. याबाबत बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, “हल्ल्यानंतर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग रद्द करण्याचे टूर ऑपरेटर आणि हॉटेल व्यावसायिकांनी पाहिलं आहे. त्यामुळे मी इथं आलो आहे. पर्यटकांनी काश्मीरला यावे," असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पर्यटकांनी रद्द करण्यात आलेल्या बुकींगमध्ये तेजीत असलेल्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षांच्या तेजीमुळे, पर्यटन आता मंदावलं आहे. हाऊसफुल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समुळे, गुलमर्ग, सोनमर्गमध्ये आज घसरण दिसून येत आहे. यामध्ये पहलगामला हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. “90 टक्के बुकिंग रद्द झाल्या आहेत, असं मी ऐतकलंय. तुमचं बुकिंग रद्द करू नका. तिकिटे बुक करा आणि इथं या. आम्ही येथे सुरक्षित आहोत. आमचे प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे,” असं त्यानं सांगितलं.

हेही वाचा :