ETV Bharat / entertainment

नेहा कक्करला चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक कोणी दिला, वाचा सविस्तर - SINGER NEHA KAKKAR BIRTHDAY

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आपला ६ जून रोजी वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी तिच्याबद्दल जाणून घ्या...

Neha kakkar
नेहा कक्कर (नेहा कक्करचा वाढदिवस (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : June 6, 2025 at 2:16 PM IST

2 Min Read

मुंबई : भारतीय गायिका नेहा कक्कर आज ६ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. नेहा आज ३७ वर्षांची झाली आहे. या प्रसंगी तिचे चाहते आणि काही स्टार्स तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देत आहेत. भारतातील गायकांमध्ये इन्स्टाग्रामवर नेहा कक्करचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. आज नेहाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिनं जगभरात संगीत उद्योगात एक जागा निर्माण केली आहे. नेहाच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला तिच्या कुटुंबाबद्दल, एकूण संपत्तीबद्दल आणि तिच्या टॉप गाण्यांबद्दल सांगणार आहोत.

लहानपणापासूनच गाण्याची आवड : नेहानं खूप लहान वयातच गाणं गायण्याची सुरुवात केली. ती जागरणांमध्ये गात असत. ९० च्या दशकात ती तिच्या कुटुंबासह दिल्लीला गेली आणि गायनात नशीब आजमावू लागली. २००५ मध्ये नेहानं इंडियन आयडलमध्ये भाग घेतला, जरी ती हा शो जिंकू शकली नाही, मात्र या शोमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर, तिनं कोरस गायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर २०१२ मध्ये प्रीतमनं तिला 'कॉकटेल' चित्रपटातील 'सेकंड हँड जवानी' हे गाणं दिलं. या गाण्यानंतर नेहा कक्करचं नशीब पूर्णपणे बदललं, तिचं हे गाणं हिट ठरलं.

नेहा कक्करची संपत्ती : नेहा ही संगीतकार आणि गायक टोनी कक्कर आणि सोनू कक्कर यांची बहीण आहे. या तिघांनीही एकत्र अनेक गाणी गायली आहेत. याशिवाय लग्नापूर्वी नेहानं पती रोहनप्रीत सिंगबरोबर अनेक गाणी गायली आहेत. तसेच नेहाची 'ख्याल राख्या कर' (२०२०), 'ला ला ला' (२०२२), 'कोका कोला तू', 'लंडन ठुमकडा' ही गाणी हिट झाली आहेत. नेहा कक्करला इंस्टाग्रामवर ७८ दशलक्ष चाहते फॉलो करतात. फॉलोअर्सच्या शर्यतीत, नेहा बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींपेक्षा पुढं आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार नेहा कक्करची एकूण संपत्ती १०४ कोटी रुपये आहे. दरम्यान नेहा चित्रपटांमधील गाणी गाण्यासह लाईव्ह परफॉर्मन्स आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम करते. याशिवाय ती म्युझिक कॉन्सर्ट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील खूप पैसे कमवते. नेहाकडे ऑडी क्यू७, मर्सिडीज बेंझ जीएलएस ३५० आणि बीएमडब्ल्यू ७ सीरीज आहेत. तसेच नेहाचे मुंबईत स्वतःचे अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत १.२ कोटी रुपये आहे. याशिवाय नेहाचा ऋषिकेश (उत्तराखंड) येथे एक आलिशान बंगला आहे.

हेही वाचा :

  1. 'कलाकारांनी मर्यादेत राहावे आणि जनतेनं...'. बहीण नेहा कक्कर मेलबर्न कॉन्सर्टमध्ये रडल्यानंतर टोनीनं केली क्रिप्टिक पोस्ट...
  2. कॉन्सर्टमध्ये गो बॅकच्या घोषणा दिल्यावर नेहा कक्कर रडू लागली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
  3. 28 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात ; करण जोहर ते नेहा कक्कर पर्यंत हे भारतीय सेलिब्रिटी करतील धमाका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.