ETV Bharat / entertainment

सलीम मर्चंटनं दहशतवादी हल्ल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त, व्हिडिओ व्हायरल... - SALIM MERCHANT

सलीम मर्चंटनं दहशतवादी हल्ल्याबद्दल आता भाष्य केलं आहे. संगीतकारानं कुराणमधील एका विशेष धड्याचाही उल्लेख केला आहे.

Salim Merchant
सलीम मर्चंट (Salim Merchant ( Photo - instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 24, 2025 at 5:32 PM IST

1 Min Read

मुंबई - मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय काहीजण यामध्ये जखमी झाली आहेत. या हल्ल्यानंतर अनेक स्टार्सनं पोस्ट शेअर करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकजण न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना निष्पाप पर्यटकांवर हल्ला हा अचानक झाल्यानंतर, तिथे खूप गोंधळ उडाला होता. पुरुष पर्यटकांना त्यांच्या प्रियजनांसमोर त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे हत्या करण्यात आली. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये तिथे काय घडले हे सर्व दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमधील सलीम मर्चंटचा संदेश : दरम्यान गीतकार-संगीतकार सलीम मर्चंट यांनी पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सलीम एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्याला मुस्लिम असल्याची लाज वाटते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या घटनेचा निषेध करत आहेत. तसेच व्हिडिओ संदेशात सलीम यांनी पहलगावमधील हत्याकांडाबद्दल म्हटलं, "पहलगावमध्ये निर्दोष लोकांची हत्या झाली, ते हिंदू होते मुसलमान नाही म्हणून त्यांना मरावे लागले. हे दहशतवादी मुस्लिम आहे? नाही हे दहशतवादी आहे. कारण इस्लाम ते शिकवत नाही." त्यानंतर त्यांनी कुराणातील सुरा अल-बकराच्या २५६व्या आयताचा उल्लेख केला. संगीतकार पुढं म्हटलं "धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. एक मुस्लिम म्हणून, असा दिवस पाहून मला लाज वाटते. माझ्या निष्पाप हिंदू बंधू आणि भगिनींना इतक्या क्रूरपणे मारण्यात आले आहे. फक्त ते हिंदू आहेत म्हणून." त्यानंतर त्यांनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेला विभाजनाचा खेळ कधी संपेल असा प्रश्न उपस्थित केला.

सलीम मर्चंटनं भावना केल्या व्यक्त : सलीम मर्चंट यांनी पुढं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासून काश्मीरमध्ये चांगले काम करणाऱ्यांना पुन्हा त्याच जुन्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माझा राग आणि दुःख कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. मी माझे डोके टेकवून प्रार्थना करतो की देवाने जीव गमावलेल्या निष्पाप लोकांच्या कुटुंबांना शक्ती द्यावी." आता सलीमचा हा संदेश ऐकूण त्यांचे अनेकजण कौतुक करत आहे. सलीमच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.