ETV Bharat / entertainment

मुकेश अंबानी यांनी दीपिका पदुकोणच्या बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - Deepika Padukone and Mukesh Ambani

Deepika Padukone and Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी हे अलीकडेच आई बनलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिच्या नवजात बाळाला भेटायला गेले होते. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 1:02 PM IST

Deepika Padukone and Mukesh Ambani
दीपिका पदुकोण आणि मुकेश अंबानी (दीपिका पदुकोण (IANS/ANI))

मुंबई Deepika Padukone and Mukesh Ambani : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग 8 सप्टेंबर रोजी पालक झाले आहेत. दीपिकानं एका मुलीला जन्म दिला आहेत आता 'दीपवीर'च्या घरी आनंदाचे वातावरण आहे. एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दीपिका सध्या आहे. दीपिका आणि रणवीर अजूनही रुग्णालयात असून त्यांना नातेवाईक भेटण्यासाठी येत आहेत. काल रात्री रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी रुग्णालयात पोहोचून दीपिकाच्या नवजात बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुकेश अंबानी हे कारमध्ये हॉस्पिटल बाहेर दिसले.

मुकेश अंबानी यांनी दिली दीपिकाच्या बाळाला भेट : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी हे हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत. त्यांच्या कारबरोबर बाकी काही गाड्या देखील दिसत आहेत. दरम्यान दीपिका लग्नाच्या 6 वर्षानंतर आई झाली आहे. 'दीपवीर'नं 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. यापूर्वी रणवीर आणि दीपिकानं 2012 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. दोघांची भेट संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटात सेटवर झाली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून दोघांची जोडी हिट ठरली. यानंतर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय केला.

दीपिका आणि रणवीरवर अभिनंदनाचा पूर : 'दीपवीर'च्या घरी मुलीच्या जन्मावर आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर दीपिका आई झाली. यापूर्वी रणवीर आणि दीपिकानं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी दीपिका ही आई बनली. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता यानंतर दीपिका ही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. सिद्धिविनायक पावला; दीपिका -रणवीरच्या घरी गणेशोत्सवात आली 'लक्ष्मी' - Ranveer Deepika first child
  2. युजर्सनी दीपिका आणि रणवीरच्या मुलीसाठी सूचवली 'ही' सुंदर नावं, जाणून घ्या याचा अर्थ - Unique Name Suggestions From Fans
  3. दीपिका पदुकोणच्या पहिल्या मॅटर्निटी फोटोशूटला 24 तासाच्या आत मिळाले 50 लाखांहून जास्त लाईक्स - DEEPIKA PADUKONE

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.