ETV Bharat / entertainment

एकेकाळी आवाजासाठी ट्रोल होणारा गायक मिका सिंग आज एका गाण्यासाठी 'एवढी' मोठी घेतो रक्कम... - MIKA SINGH BIRTHDAY

पंजाबी गायक मिका सिंग १० जून रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. तो भारतातील पहिला गायक आहे, ज्यानं स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे.

Mika singh
मिका सिंग (मिका सिंग (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : June 10, 2025 at 4:41 PM IST

2 Min Read

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक गायक आणि अभिनेते आहेत, ज्यांचे आयुष्य संघर्षानं भरलेले होते, आज आम्ही तुम्हाला अशाच एका गायकाबद्दल सांगणार आहोत, ज्याला सुरुवातीला त्याच्या आवाजासाठी खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. पण आज त्याच्या गाण्याशिवाय पार्ट्या अपूर्ण आहेत. तो त्याच्या एका गाण्यासाठी लाखो रुपये घेतो, आज १० जून रोजी पंजाबी गायक मिका सिंग हा ४८ वर्षांचा झाला आहे. 'सावन में लग गई आग' ते 'चिंता ता चिता चिता'पर्यंत गाण्यांना त्यानं आवाज दिला आहे. आजही मिका सिंग त्याच्या गाण्यांनी बॉलिवूडवर राज्य करत आहे.

पंजाबी गायक मिका सिंग आवाजामुळे झाला होता ट्रोल : मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आवाजासाठी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मिका एकेकाळी कीर्तन, जागरण आणि कव्वाली गात होता. जेव्हा तो चित्रपटसृष्टीत आला तेव्हा त्याला त्याच्या आवाजासाठी खूप ट्रोल करण्यात आले. स्वतः एका मुलाखतीत त्यानं खुलासा केला की, लोक त्याला टोमणे मारायचे आणि म्हणायचे- तो तानसेनचा मुलगा असल्याचे दाखवितो. याशिवाय त्याला अनेकजण नाकानं गात असल्याचं देखील म्हणत होते. यानंतर तो नाराज झाला होता, मात्र त्यानं हिंम्मत हारली नाही. १९९८ मध्ये मिका सिंगचे 'सावन में लग गई आग' हे गाणं आल्यानंतर तो एका रात्रीत स्टार बनला. त्याचं हे गाणं खूप हिट झालं. आताही हे गाण अनेक लग्न आणि पार्ट्यांमध्ये वाजवले जाते.

मिका सिंग दिला 'या' व्यक्तीनं ब्रेक : मिका जेव्हा त्याचे जुने दिवस आठवतो, तेव्हा तो अजूनही भावनिक होतो. मिका हा दलेर मेहंदीचा धाकटा भाऊ आहे आणि त्यानेच मिकाला इंडस्ट्रीत ब्रेक दिला. मिका बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी गायकांपैकी एक आहे. आज मिका एका गाण्यासाठी ६-८ लाख रुपये घेतो. मिकाला अनेक आलिशान गोष्टींचाही शौकीन आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा संग्रह आहे , ज्यामध्ये ८० लाख किंमतीची हमर आहे. याशिवाय, त्याच्याकडे पोर्श, लॅम्बोर्गिनी, द क्लासिक लॉर्ड मस्टँग देखील आहेत. मिकाकडे एक आलिशान बंगला आणि अनेक घरे आहेत. इतकेच नाही तर तो पहिला भारतीय गायक आहे, ज्यानं एक खाजगी बेट खरेदी केले आहे, ज्यात एक तलाव, ७ बोटी आणि १० घोडे आहेत.

मिका सिंगची सर्वोत्तम गाणी

  • सावन में लग गई आग
  • दमा दम मस्त कलंदर
  • तू मेरा हीरो
  • हीर तो बड़ी सैड है
  • आज की पार्टी
  • आपका क्या होगा
  • दिल में बजी गिटार
  • सुबह होने ना दें
  • आंख मारे
  • मौजा ही मौजा
  • पार्टी तो बनती है
  • लॉन्ग ड्राइव
  • पुंगी
  • पुष्पा पुष्पा

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant Kiss Case : मिका सिंगने बळजबरीने घेतला होता राखीचा किस; न्यायालयाने सांगितले की....
  2. मिका दी वोहती: मिका सिंगने भावी पत्नी म्हणून आकांक्षा पुरीची केली निवड
  3. Swayamvar Mika Di Vohti : वधू शोधण्यासाठी मिका सिंग इंदूरमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.