मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या 'देवमाणूस' या चित्रपटामधील 'आलेच मी' गाण्यामुळे चर्चेत आहे. आता तिचं हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. या लावणीमधील तिचा डान्स हा दमदार आहे. या गाण्यावर अनेकजण आपले रिल्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सई ताम्हणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणीवर थिरकली आहे. सईची लावणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. आता ही लावणी हिट झाल्यानंतर गौतमी पाटीलनं देखील एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आता गौतमीचं हे रिल तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
गौतमी पाटीलचा धमाकेदार लावणीवरील डान्स : गौतमीनं आजवर तिच्या लावणीवरील नृत्यांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे. आता तिनं सईच्या 'आलेच मी' गाण्यावर नृत्य करून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचं मनं जिंकलं आहे. सईनं देखील गौतमीच्या या व्हिडिओवर 'विषय कट' अशी कमेंट केली आहे. दरम्यान या व्हिडिओच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप छान डान्स करता ताई.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'नेहमीप्रमाणे सुंदर.' आणखी एकानं लिहिलं 'खूप सुंदर दिसतेस गौतमी.' याशिवाय अनेकजण गौतमीच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
'देवमाणूस' चित्रपटाबद्दल : दरम्यान 'देवमाणूस' या चित्रपटामधील लावणी नृत्यासाठी सईनं जवळपास ३३ तासाचा सराव केला होता. या लावणीबद्दल सईनं म्हटलं होतं, "लावणी करणं हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. हा एक माझा नवीन प्रयत्न होता आणि यात मला खूप मजा आली. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी चांगली लावणी साकारता आलीच नसती. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, यासाठी मी खूप आभारी आहे." 'देवमाणूस' या चित्रपटामधील लावणीसाठी आवाज बेला शेंडे यांनी दिला आहे. याशिवाय यात रोहन प्रधान यांनी साथ दिली आहे. या गाण्याला संगीत रोहन-रोहन यांनी दिलंय. 'देवमाणूस' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर २५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. तसेच 'देवमाणूस'चं दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलंय. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा :