मुंबई - 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचा आनंद घेत आहे. तिनं तिच्या सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ खूप आकर्षक आहे. तेजश्री प्रधाननं शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या अनेक चाहत्यांना खूप आवडत आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तिनं तिच्या व्हिडिओच्या पोस्टवर कॅप्शन देत लिहिलं, 'एके जिंदगी मेरी...में जीना पूरी तरह.' आता तिच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप छान एंजॉय कर.' दुसऱ्या एकानं लिहिलं. 'मला निसर्गात राहायला खूप आवडते.. तू सहलीचा आनंद घे... तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.' आणखी एकानं लिहिलं, 'माझी सर्वात आवडती व्यक्ती.'
तेजश्री प्रधाननं हिमाचल प्रदेशमधील व्हिडिओ केला शेअर : व्हिडीओमध्ये तेजश्री हिमाचलमधील डोंगर, पर्वत रांगा, नदी, फुलांची बागांमध्ये फिरताना दिसत आहे. याशिवाय ती नदी किनार वेळ घालताना दिसत आहे. तेजश्रीनं शेअर केलेल्या या खास व्हिडिओमध्ये हिमाचलमधील सुंदर निसर्गाचं दर्शन तिच्या चाहत्यांना घडत आहे. तसेच तिनं तिच्या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'एकही शब्द समजला नाही, पण या छोट्या मित्राशी खूप छान संवाद साधला.' तिचा हा फोटो देखील आता अनेकजण लाईक करत आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोत ती निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेताना दिसत आहे. तेजश्रीला हिमाचलमधील सफर खूप शानदार वाटला आहे.
तेजश्री प्रधानचं वर्कफ्रंट : तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अलीकडेच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली. आता तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत. याशिवाय तेजश्रीनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. यामध्ये 'लोकशाही 2024', 'पंचक', 'बबलू बॅचलर', 'ओली की सुकी', 'ती सध्य काय करते' आणि 'लग्न पहावे करून' यांचा समावेश आहेत. तेजश्रीचा 'पंचक' हा चित्रपट खूप गाजला आहे. या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचा पती डॉ.श्रीराम नेने यांनी केली आहे.