ETV Bharat / entertainment

'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' उलगडणार 'मंगलाष्टका रिटर्न्स' मधून! - MANGALASHTAK RETURNS MOVIE

'मंगलाष्टका रिटर्न्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याबद्दल जाणून घ्या...

mangalashtak returns
मंगलाष्टका रिटर्न्स (Mangalashtak Returns - Movie Poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 28, 2025 at 2:34 PM IST

Updated : April 28, 2025 at 3:32 PM IST

1 Min Read

मुंबई - प्रेमकथांना नेहमीच चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळालं आहे. विविध रूपांत प्रेमकथा आपल्याला पडद्यावर पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' या आगळ्या टॅगलाइनसह 'मंगलाष्टका रिटर्न्स' हा चित्रपट २३ मे रोजी रसिकांच्या भेटीला येतो आहे. अलीकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या एका हटके टीझर पोस्टरनं या चित्रपटाची उत्सुकता वाढवली होती, आणि आता अधिकृत पोस्टरही लॉन्च करण्यात आलं आहे.

'मंगलाष्टका रिटर्न्स'ची कहाणी : 'मंगलाष्टका रिटर्न्स'च्या टॅगलाइनवरून स्पष्ट होते की ही, गोष्ट सरळसोट नाही तर विविध गोंधळांमधून, उलथापालथीमधून पुढे सरकते. त्यामुळे प्रेक्षकांना नेहमीपेक्षा वेगळा, अनोखा प्रेमकथेचा अनुभव मिळणार आहे. पोस्टरवरूनही चित्रपटाचा फ्रेश आणि हलकाफुलका टोन लक्षात येतो. कथेचा गाभा दोन राजकीय दृष्ट्या विरोधी विचारसरणी असलेल्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या तरुण-तरुणीभोवती फिरतो. ते एकाच महाविद्यालयात शिकत असताना, त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात. पारंपरिक प्रेमकथेच्या बाहेर जात ही कथा प्रेमाच्या रंजक वळणांना, संघर्षांना आणि नात्यांमधील सूक्ष्म गुंतागुंतींना स्पर्श करते.

Mangalashtak returns
'मंगलाष्टका रिटर्न्स' (Mangalashtak Returns - Movie Poster)

'मंगलाष्टका रिटर्न्स'ची स्टार कास्ट : 'शारदा फिल्म्स प्रोडक्शन'च्या वीर कुमार शहा यांनी प्रस्तुत केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. डॉ. भालचंद्र यांच्या लेखणीतून साकारलेली कथा आणि संवाद, पी. शंकरम यांचं संगीत, विकास सिंह यांचं सर्जनशील छायाचित्रण आणि एस. विक्रमन यांचं कसदार संकलन या चित्रपटाच्या गुणवत्तेची हमी देतात. या चित्रपटात वृषभ शाह आणि शीतल अहिरराव या नव्या जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. दोघांचे फ्रेश लूक आणि ट्युनिंग लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरे जसे की प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात आणि समीर पौलस्ते हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. प्रेम, संघर्ष, आणि नात्यांची नव्यानं उलगडणारी गोष्ट 'मंगलाष्टका रिटर्न्स'मधून येत्या २३ मे रोजी उलगडणार आहे.

Last Updated : April 28, 2025 at 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.