ETV Bharat / entertainment

महिमा चौधरीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास...

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा आज वाढदिवस आहे. आज या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला तिच्याविषयी काही न माहित असलेल्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

Mahima Chaudhry
महिमा चौधरी (Mahima Chaudhry (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : September 13, 2025 at 1:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - 'परदेस' फेम बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी आज तिचा ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. ४२हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री ९०च्या दशकातील टॉप हिरोइनच्या यादीत होती. आकर्षक सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळं तिला अनेक लोक पसंत करत होते. दरम्यान या सुंदर अभिनेत्रीची अनेकदा प्रेमात फसवणूक झाली आहे. तसेच तिला तिच्या आयुष्यात आणखी एक दु:ख आलं, ते म्हणजे तिला कर्करोगासारख्या प्राणघातक आजार. यावर देखील तिनं मात केली होती.

महिमा चौधरीचं पुन्हा झालं हार्टब्रेक : यानंतर ती २०००मध्ये ती दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेसच्या प्रेमात पडली. त्यावेळी पेस हा आघाडीचा खेळाडू होता. महिमानं या खेळाडूला भेटनं अधिक सुरू केलं होतं. यानंतर या दोघांमध्ये प्रेम झालं. ज्यावेळी लिएंडर पेस खेळायचा तेव्हा महिमा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जात असतं. या दोघांमध्ये तीन वर्षे सर्व काही ठीक चाललं, पण अचानक या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. यानंतर पेसचं नाव संजय दत्तची पहिली पत्नी प्रसिद्ध मॉडेल रिया पिल्लईशी जोडले गेले.

महिमा चौधरीनं केलं बॉबी मुखर्जीशी लग्न : बऱ्याच वर्षांनंतर, २००६ मध्ये, महिमा बॉबी मुखर्जी नावाच्या व्यक्तीला भेटली, जो कोलकात्याचा एक आर्किटेक्ट होता. हा व्यक्ती महिमाच्या भावाचा खूप जवळचा मित्र होता. यामुळं अनेकदा दोघेही सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटत असत. बॉबीचा घटस्फोट झाला होता आणि तो पुन्हा लग्न करण्याचा विचार करत होता. बॉबी आणि महिमा त्यांनी १९ मार्च २००६ रोजी लग्न केलं. या दोघांनी गुप्तपणे लग्न केलं होतं. यानंतर २३ मार्च २००६ रोजी त्यांनी बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केलं. याशिवाय अभिनेत्री लग्नाशिवाय गर्भवती राहिली असेल, म्हणून शांतपणे लग्न केलं असं अनेकजण म्हणू लागले होते. कारण तिनं अचानकपणे गरोदरपणाची घोषणा केली होती. २००७ मध्ये महिमानं एका मुलीला जन्म दिला. २००७ पर्यंत दोघांमध्ये सर्व काही ठीक होतं, मात्र बॉबी आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नीची कायदेशीर लढाई झाली. यानंतर महिमाचं लग्न तुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तसेच दिवसेंदिवस हे जोडपे दूर होऊ लागले होते. अखेर २०१३ मध्ये दोघे वेगळे झाले. तेव्हापासून महिमा सिंगल मदर म्हणून आयुष्य जगत आहे.

हेही वाचा :

  1. Mahima Chaudhry News : स्तनाच्या कर्करोगाच्या वेळी संजय दत्त अन् मार्टिना नवरातिलोवामुळे प्रेरित झाली - महिमा चौधरी