मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री लारा दत्ता आज १६ एप्रिल रोजी ४७ वर्षांची झाली. लारा ही एक उत्तम बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केलंय. याशिवाय तिनं आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लारा दत्तानं २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचा पहिला चित्रपट हिट ठरला. एक काळ असा होता, जेव्हा लाराला तिचे करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आज ती कोट्यवधी रुपयांची मालकिण आहे. तसेच ती एका प्रसिद्ध खेळाडूची पत्नी आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी इतिहास रचला : लारानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती आणि माजी मिस इंडिया दिया मिर्झा एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होत्या आणि पैशांअभावी ते नूडल्स खाऊन जगत होते. तसेच दियानं असेही सांगितलं होतं की, प्रियांकाला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा होता, मात्र लारा आणि तिला खूप संघर्ष करावा लागला. मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करताच लारानं खळबळ उडवून दिली. २०००मध्ये लारानं मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवून लारानं इतिहास रचला. लारा दत्तासह मिस युनिव्हर्सचा किताब आतापर्यंत तीन भारतीय सुंदरींनी जिंकला आहे. यामध्ये सुष्मिता सेन (१९९४) आणि हरनाज संधू (२०२४) यांचा समावेश आहे.
हे ५ चित्रपट ठरले फ्लॉप : लारा दत्तानं 'अंदाज' (पदार्पण चित्रपट), 'खाकी', 'मस्ती', 'नो एंट्री', 'भागम भाग', 'पार्टनर', 'हाऊसफुल 'आणि 'डॉन २'सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. गेल्या काही वर्षांत लाराचा एकही मोठा हिट चित्रपट आलेला नाही. तसेच तिचे 'बेल बॉटम', 'वेलकम टू द न्यूयॉर्क', 'अझहर', 'सिंग इज ब्लिंग' आणि तमिळ चित्रपट 'डेव्हिड' चित्रपट फ्लॉप झाले. यामुळे अभिनेत्रीची करिअरमध्ये अडचणं येऊ लागल्या. लारा दत्ता आज ४७ वर्षांची असली तरी, आता देखील ती खूप सुंदर दिसते. दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं २०११मध्ये माजी खेळाडू महेश भूपतीशी लग्न केलं. या लग्नापासून तिला एक मुलगी सायरा आहे. लारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांबरोबर आपले फोटो शेअर करत असते. दरम्यान साराच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलयचं झालं तर ती पुढं 'वेलकम ३' आणि नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामध्ये दिसणार आहे.