मुंबई - कुणाल कामराला शोधण्यासाठी, त्याला धमकी देणाऱ्या साठी त्यानं एक पोस्ट लिहून इशारा दिला आहे. सविस्तर पत्र लिहून त्यानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आपण काहीही चूकीचं केलं नसल्याचं म्हटलंय. दरम्यान, त्याचा फोन नंबर लीक करुन त्याला धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही त्यानं अक खास इशारा दिलाय. यात तो म्हणतो, "जे लोक माझा नंबर लीक करण्यात गुंतले आहेत किंवा मला सारखा कॉल करत आहेत त्यांच्यासाठी: 'तुम्हाला आतापर्यंत हे लक्षात आले असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉइसमेलवर जातात, तिथं तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल जे तुम्हाला आवडत नाही.'"
अजित पवार जे बोलले तेच मी बोललो, माफी मागणारा नाही: कुणाल कामरा
"मी माफी मागणार नाही. मी जे काही बोललो नेमकं तेच अजित पवार ( उपमुख्यमंत्री ) यांनीही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं होतं. मी जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगावर लपून बसून मामला थंड होण्याची वाट पाहणाऱ्यांपैकीही नाही.", असंही कुणाल कामरानं म्हटलंय
शिंदे सैनिक: तूने CM साहब के बारे में क्या बोला?
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) March 24, 2025
कुणाल: वो CM नहीं डिप्टी CM हैं
शिंदे सैनिक: किधर रहता है तू?
कुणाल: तमिलनाडु
शिंदे सैनिक: किधर आने का?
कुणाल: तमिलनाडु
शिवसैनिक: अभी तमिलनाडु कैसे पहुंचेगा भाई?
ग़ज़ब कॉमेडी चल रही है भाई 🤣😂🤣 pic.twitter.com/EccQkrIZ4a
कुणाल कामराला फोनवरुन धमकी, तामिळनाडूत आहे कॉमेडियन? - कुणाल कामराला धमकी देण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. त्याचा फोन नंबर लीक झाल्यानं काही शिंदे समर्थक त्याला फोन करुन शिविगाळ करत आहेत. आज सकाळी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिय श्रीनेत यांनी कुणालला धमकी दिली जात असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये शिंदे समर्थक कार्यकर्ता धमकी देत विचारतो की तू कुठं आहेस? यावर कुणाल त्याला तामिळनाडूत असल्याचं सांगतो आणि तिथं येण्याचं आमंत्रण देतो.
हॅबिटेट माझ्या कॉमेडीसाठी जबाबादार नाही - हॅबिटेट क्लबवर हल्ला झाल्याबद्दल कुमाल कामरानं आपल्या पोस्टमध्ये हळहळ व्यक्त केली आहे. आपण जे काही सादर केलं त्यात या मंचाचा काहीही संबंध किंवा हस्तक्षेत नव्हता असं त्यानं म्हटलंय. आपल्या निवेदनात तो या विषयी म्हणतो, 'मनोरंजनाचं ठिकाण हा एक मंच असतो. सर्व प्रकारच्या कार्यक्रम सादरीकरण करण्याची ती एक जागा असते. हॅबिटेट हे माझ्या कॉमेडीसाठी जबाबादार नाहीत, किंवा मी जे काही सादर केलं त्यावर त्याचं नियंत्रणही नव्हतं. कुठल्याही राजकीय पक्षाचाही याच्याशी संबंध नव्हता. कॉमेडियनचा कार्यक्रम सादर झालेल्या स्थळावर हल्ला करणं म्हणजे तुम्हाला वाढलेलं बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमँटोचा ट्कर पलटवण्यासारखं आहे.'
हेही वाचा -