मुंबई - स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या सर्व प्रसार माध्यमांच्या मथळ्यांमध्ये शीर्ष स्थानी आहे. त्यानं एकनाथ शिंदेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता 'ठाणे की रिक्श, चेहरे पे दाढी...' हे वादग्रस्त गाणं सादर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला आक्रमक स्वरुप प्राप्त झालंय. शिवसेना उबाठा गटाचे समर्थक कुणालच्या या गाण्याचं समर्थन करत असून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते कुणालच्या विरोधात उघडपणे बोलत आहे. अनेक लोकांनी कुणालला मारण्याची, त्याचे यापुढं महाराष्ट्रात शो होऊ न देण्याची, त्याच्या तोंडाला काळ फासण्याची भाषा केली आहे. त्यानं माफी मागावी अशी सत्ताधारी पक्षांची मागणी असताना, 'आपण माफी मागणार नाही', असं ठणकावत सांगत कुणालनं 'यापूर्वी जे अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल बोलले तेच मी बोललो', असं सांगणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, कुणाल कामरानं त्याच्या कॉमेडी शोमध्ये सादर झालेलं एक नवं विडंबन गीत सादर केलंय. सध्या भारताच्या राजकारणात ज्या गोष्टी घडताहेत, जे अराजक माजवलं जातंय, ज्या प्रकारे अंधविश्वास पसरवला जातोय, बुवाबाजीचे प्रकार घडताहेत, दंगली घडताना पोलीस हतबल झालेत, गरीबी, बेरोजगारी यामध्ये देश कंगालतेकडं झुकलाय असा आशय असलेलं हे नवं व्यगात्मक गाणं आहे. कुणालनं पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या सुरूवातील तो या गाण्याचं वर्णन करताना 'विकसीत भारताचं नवं राष्ट्रगीत', असं म्हणतो. या विडंबन गीताचे बोल पुढील प्रमाणे आहेत.
हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन
मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन
होंगे नंगे चारो ओर, होंगे दंगे चारो ओर, पोलीस के पंगे चारो ओर एक दिन
मन में नथूराम, हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन
होगा गाय का प्रचार, लेके हातों में हाथियार, होगा संघ का शिष्ठाचार एक दिन
जनता बेरोजगार, गरीबी की कगार, हम होंगे कंगाल एक दिन...
हे गीत कुणालनं सादर केलं असून ज्या द हॅबिटेट क्लबमध्ये तोडफोड झाली त्या दृष्यांसह अनेक आशयाला समर्पक सीन्सचा समावेश त्यानं गाण्यामध्ये केला आहे.
हेही वाचा -