ETV Bharat / entertainment

तोडफोडीच्या घटनेनंतर कुणाल कामराची पहिली रिअ‍ॅक्शन, फोटो पोस्ट करुन दिलं उत्तर - KUNAL KAMRA FIRST REACTION

कुणाल कामरानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता उपहासात्मक गाणं सादर केल्यानंतर राजकारण तापलं आहे. यावर कुणाल कामरानं प्रतिक्रिया दिली आहे.

Kunal Kamra X post
कुणाल कामराची X वर प्रतिक्रिया (Kunal Kamra X post/ Etv BHarat reporter)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 24, 2025 at 2:24 PM IST

Updated : March 24, 2025 at 6:04 PM IST

2 Min Read

मुंबई - स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं लिहून टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला. ज्या ठिकाणी कुणालचा शो झाला होता त्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तोडफोड करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. कुणाल कामराचा हा वादग्रस्त ठरलेला व्हिडिओ शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर करत पाठिंबा दर्शवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामरानं माफी मागावी, असा इशारा दिला आहे.

कुणाल कामराची प्रतिक्रिया - कुणाल कामराचा शो ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाली आहे. याला उत्तर देण्यासाठी कुणाल कामरानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्या हातात एक पॉकेट साईज भारतीय घटनेच्या पुस्तकाची प्रत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, "पुढं जाण्याचा हा एकमेव मार्ग..." याचा अर्थ कुणाल कामरा त्याच्या उपहासात्मक टीका करण्याच्या त्याच्या अधिकारावर ठाम असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इशारा देत आपल्या परफॉर्मन्सचं समर्थन करताना दिसत आहे. ही पोस्ट त्यानं 24 मार्चच्या मध्यरात्री पोस्ट केली होती.

कुणाल कामरावर एफआयआर दाखल - मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँड-अप शो सुरू असताना कामरानं 'दिल तो पागल है' या गाण्यावर आधारित एक विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यामधून एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये केलेल्या शिवसेनातील बंडाचा संदर्भ होता. ही गोष्ट शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नाही. त्यांनी हॉटेलमध्ये घुसून हॉलमधील साहित्याची नासधूस केली होती. त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

कुणाल कामराचा शो जिथं झाला त्या ठिकाणाचा वादग्रस्त इतिहास - मुबंईच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कुणाल कामराचा स्टँड अप कॉमेडी शो पार पडला आणि सध्या वादात अडकला आहे. खरंतर याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शोदेखील झाला होता. यामध्ये रणवीर अलाहबादियानं वादग्र्स्त विधान केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आले तेव्हा कॉमेडियन रजत सूद याचा कार्यक्रम सुरू होता. हा शो कार्यकर्त्यांनी उधळून लावला आणि तोडफोड केली.

कुणाल कामराचे वाद - कुणाल कामरावर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2020 मध्ये तो इंडिगोच्या विमानातून मुंबई ते लखनौ प्रवास करत असताना त्यानं एका राष्ट्रीय वाहिनीच्या संपादकांची खिल्ली उडवली होती आणि त्याचा व्हिडिओ बनवला होता. या घटनेनंतरही राजकारण तापलं होतं. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी कामराच्या कृतीचं समर्थनं केलं होतं. त्यावेळच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी कुणाल कामराचं वागणं आक्षेपार्ह ठरवलं होतं. यानंतर इंडिगोसह इतर काही विमान कंपन्यांनी कुमाल कामरावर तात्पुरती बंदी घातली होती.

कुणाल कामराचं विडंबन गीत ((Kunal Kamra X AC))

सलमान खानचं काळवीट शिकार आणि हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन खटल्यांबद्दल कुमाल कामरानं टीका केली होती. सलमान खानवर विनोद केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कुणाल कामरावर भरपूर तोंडसूख घेतलं होतं.

हेही वाचा -

Last Updated : March 24, 2025 at 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.