ETV Bharat / entertainment

कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मद्रास हायकोर्टाचा झटका - KUNAL KAMRA BAIL

कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा करण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.

Kunal Kamra
कुणाल कामरा ((Photo -KUNAL KAMRA STAND UP screen grab ))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 17, 2025 at 8:32 PM IST

1 Min Read

चेन्नई - स्टँड अप कॉमेडियन अभिनेता कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर युट्यूबवर टीका केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा विजय झाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. कुणाल कामरा यानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक विडंबनाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेपासून वेगळे होऊन भाजप युतीत सामील झाल्याबद्दल आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल टीका केली होती.

या व्हिडिओनंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कुणालनं मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. दुसऱ्या राज्यात नोंदवलेल्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मागण्यासाठीची ही याचिका होती. यामध्ये कुणाल कामरानं आपण तामिळनाडू राज्याचा रहिवासी असल्याचं आणि विल्लुपुरममध्ये राहात असल्याचं म्हटलं होतं. तो जर मुंबईला गेला तर त्याला धोका असून यासाठी त्यानं अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी कुणाल कामराला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. अलीकडेच न्यायाधीश सुंदर मोहन यांच्यासमोर पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी झाली. कुणाल कामराच्या वतीनं बाजू मांडणारे वकील व्ही. सुरेश यांनी न्यायालयाला सांगितलं की, कुणाल कामरा यानं त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी दाखल केली आहे आणि निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. निकाल जाहीर होईपर्यंत त्याला अटक करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर, मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा करण्याची गरज नाही आणि कुणाल कामरानं अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली याचिका रद्द केली.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.