मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडबंन गीतामुळे वादग्रस्त ठरलेल्या कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने शुक्रवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील वानूर येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडे जामीन भरण्याची अट न्यायालयानं घातली आणि त्याला जामीन मंजुर केला. मद्रास हायकोर्टीचे न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी दुसऱ्या प्रतिवादीला (खार पोलिस) नोटीस बजावली आणि या प्रकरणाची सुनावणी ७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
तामिळनाडूचा रहिवासी आहे कुणाल कामरा - कुणाल कामरा हा 2021 मध्ये मुंबईहून तामिळनाडूत राहण्यासाठी गेला आहे. तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्याचा तो रहिवासी आहे. त्याचं वादग्रस्त ठरलेलं गाणं प्रसिद्ध झाल्यापासून एकनाथ शिंदे समर्थक कार्यकर्त्यांचा त्याच्यावर राग आहे. त्यामुळं तो त्याच्या राज्यात निघून गेला आहे. त्याच्या विरोधात मुंबई पोलिसामध्ये एफआयआर दाखल झाली असून त्याला अटक करण्याच्या तयारीत पोलीस आहेत. मात्र त्यानं थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली आणि मुंबईत आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. अखेर त्याला हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असून मुंबईत दाखल झालेल्या तक्रारी संदर्भातील सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे.
काय आहे कुणाल कामराचं वादग्रस्त प्रकरण? - मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कुणाल कामरानं एक शो सादर केला होता. त्यातील एक गाणं वादग्रस्त ठरलं. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून टीका करण्यात आली होती. यानंतर शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना राग आला आणि त्यांनी हॅबिटेट क्लबमध्ये घुसून तोडफोड केली होती. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या केलेल्या तक्रारीवरून खार पोलिसांनी कामरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -