मुंबई - सुपरस्टार यश स्टारर 'केजीएफ'नं जगभरात धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटामुळे यशनं चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण केली. आजही प्रेक्षक 'रॉकी भाई'बद्दल वेडे आहेत. 'केजीएफ' फ्रँचायझीचे दोन्ही भाग ब्लॉकबस्टर झाल्यानंतर, चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता यशनं ही प्रतीक्षा देखील संपवली आहे. खरंतर, निर्मात्यांनी 'केजीएफ 2'ला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये अध्याय 3ची घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान एप्रिल 2022मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'केजीएफ चॅप्टर 2'नं देखील रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली होती.
'केजीएफ चॅप्टर 2' रिलीज होऊन झाली तीन वर्ष : तसेच 'केजीएफ चॅप्टर 2'ला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रॉडक्शन हाऊस होम्बाले फिल्म्सनं एक खास व्हिडिओ मॉन्टेज शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'केजीएफ चॅप्टर 2'ची 3 वर्षे साजरी करत आहे, एका भयानक वादळानं रुपेरी पडदा हादरवून टाकला, थिएटरना उत्सवाच्या आखाड्यात रूपांतरित केले आणि सोन्यात कोरलेला वारसा सोडला.' तसेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक संस्मरणीय दृश्ये दाखविण्यात आली आहे. 'केजीएफ चॅप्टर 2'चं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलंय. या चित्रपटामध्ये यश व्यतिरिक्त संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि इतर अनेक कलाकार झळकले आहेत.
'रॉकी भाई' लवकरच परत येईल : दरम्यान शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शेवटी दिलेल्या व्हॉइसओव्हरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलंय. "केजीएफची कहाणी... रॉकीची कहाणी... ती अपूर्ण राहू शकत नाही." असा आवाज यामध्ये आहे. यानंतर लगेचच, 'केजीएफ चॅप्टर 3' पडद्यावर येतो आणि रॉकी भाई म्हणतो - "लवकरच भेटू." दरम्यान एका मुलाखतीत, यशनं स्वतः पुष्टी केली की, 'केजीएफ 3' पाइपलाइनमध्ये आहे. रॉकी भाईची भूमिका साकारणारा यशनं म्हटलं होतं, "केजीएफ 3 नक्कीच बनवला जाईल, मी वचन देतो. पण मी या दोन प्रकल्पांवर (टॉक्सिक आणि रामायण) लक्ष केंद्रित करत आहे." आता अनेकजण 'केजीएफ 3'मधील रॉकी भाईचा पुन्हा अंदाज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा :