मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'केसरी चॅप्टर २' हा अखेर आज १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा अनेकांना आवडला होता. निर्मात्यांनी रिलीजपूर्वी पहिले फॅन स्क्रिनिंग आयोजित केले होते. यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या चित्रपटाचे अनेक कलाकार आणि राजकारण्यांकडून आधीच कौतुक झालंय. राणा दग्गुबतीपासून ते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तापर्यंत सर्वांनी 'केसरी चॅप्टर २'चित्रपटाचे कौतुक केलंय. आता सामान्य प्रेक्षकांकडूनही चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया आल्या आहेत. सामान्य प्रेक्षक देखील या चित्रपटाचं कौतुक करत आहे.
'केसरी चॅप्टर २'चा एक्स रिव्ह्यू : पहिल्या फॅन स्क्रिनिंगला गेलेल्या प्रेक्षकांनी अक्षय कुमार स्टारर चित्रपटाबद्दलचे पुनरावलोकन शेअर केले आहे. त्यापैकी अनेकांनी थिएटरचे व्हिडिओ पोस्ट करत ट्विट केलंय. बहुतेक पुनरावलोकन सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. अनेकांना अक्षय कुमारचा अभिनय आवडला आहे. तर काहींना यात त्रुटीही शोधल्या आहेत. आता या चित्रपटाबद्दल एका चाहत्यानं लिहिलं,'केसरी चॅप्टर २'ला बहुतेक सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत, पण धर्माबद्दल ते चांगल्या प्रकारे प्रदर्शित करू शकले नाही. अक्षयच्या अभिनयानं कधीही निराश होत नाही, हा आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनय आहे. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'केसरी चॅप्टर २' एकदम उत्तम आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन आणि अगदी अनन्या पांडे यांनीही उत्कृष्ट अभिनय केला आहे. देशभक्तीनं भरलेला एक मनोरंजक कोर्टरूम ड्रामा. उत्तम काम, नक्कीच पाहण्यासारखे आहे. आणखी एकानं लिहिलं, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम चित्रपट आहे, 'केसरी चॅप्टर २'चा पहिला सार्वजनिक आढावा - हा एक उत्कृष्ट नमुना आहे.'

#KesariChapter2 is absolutely phenomenal.A powerful tribute to India’s indomitable spirit.What a film with outstanding performances by @ActorMadhavan, @akshaykumar, and even @ananyapandayy.Gripping courtroom drama infused with patriotism. Brilliant work,definitely a must-watch! pic.twitter.com/VYRvngAGd2
— आईम ✨️ (@IshnMadhu2) April 17, 2025
🥳seeti maar reaction from #Delhi special fan screening for 😍💯 #KesariChapter2 in cinemas now book your tickets now #AkshayKumar #kesarichapter2from18thapril #Kesari2 #KesariChapter2Review #kesari2review #Kesari#Bollywood #Akkians #AkshayKumar𓃵 #AkshayKumarfans pic.twitter.com/VYI0iw3xZO
— 😎Gaurav Akshay Kumar🇮🇳 FAN PAGE ACCOUNT (@GauravAkshay16) April 17, 2025
First Review #Kesari2 :
— Umair Sandhu (@UmairSandu) April 14, 2025
Old wine in a new bottle ! #AkshayKumar is totally miscast! Mediocre performance by him. #RMadhavan acts well. Strictly film made for High Class multiplexes. Below average production values, Screenplay & Direction. Dharma production is FLOP now.
2⭐️/5⭐️ pic.twitter.com/CfnUhtRSYy
नकारत्मक यूजर्सच्या प्रतिक्रिया : नकारात्मक पुनरावलोकबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटाची पोस्ट शेअर करताना एका लिहिलं, 'खूप कंटाळवाणे, 'केसरी चॅप्टर २' अधिक चांगला होऊ शकला असता.' दुसऱ्या एकानं लिहिलं 'नव्या बाटलीत जुनी दारू, अक्षय कुमारचा अभिनय ठिक होता. आर माधवननं चांगली कामगिरी केली. धर्मा प्रॉडक्शन्स अधिक चांगले करू शकले असते.' दरम्यान रिलीजच्या पहिल्या दिवशी अक्षय कुमारचा हा चित्रपट ४-५ कोटींची कमाई करू शकतो. तसेच 'केसरी चॅप्टर २'च्या निर्मात्यांना या चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाची कहाणी १९ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. या संपूर्ण हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या मायकेल ओ'डायर आणि ब्रिटीश अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे चेत्तूर शंकरन नायर यांनी या घटनेमागील सत्य हे जगासमोर आणलं होतं. हा चित्रपट रघु पलत-पुष्पा पलतची 'अ केस दैट शुक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे. 'केसरी चॅप्टर २' या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शननं केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलंय. 'केसरी चॅप्टर २' चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :