ETV Bharat / entertainment

केसरी २ चा फर्स्ट लूक : वकीलाच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि माधवन, अनन्या पांडेही करणार युक्तिवाद - KESARI 2 R MADHAVAN FIRST LOOK

अक्षय कुमारच्या 'केसरी २' च्या जबरदस्त टीझरनंतर आता आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

KESARI 2 R MADHAVAN FIRST LOOK
केसरी २ चा फर्स्ट लूक (KESARI 2 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 28, 2025 at 7:56 PM IST

1 Min Read

मुंबई - अक्षय कुमारची दमदार भूमिका असलेला 'केसरी २' हा चित्रपट येत्या १८ एप्रिल रोजी देशभर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी चाहत्यांच्यातील उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी प्रमोशनचं पद्धतीर नियोजन केलंय. चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज केल्यानंतर, आता निर्मात्यांनी आर माधवनचा पहिला लूक रिलीज केला आहे.

'केसरी २' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. परंतु अगोदरच्या कथेला यामध्ये पुढं नेण्यात आलेलं नाही तर नव्या कथानकासह यात अक्षयसह इतर कलाकार प्रेक्षकांना भेटतील. यानिमित्तानं पुन्हा एकदा जालियनवाला हत्याकांडाची भावनिक कहाणी मोठ्या पडद्यावर आणली जात आहे.

अक्षय कुमार विरुद्ध आर माधवन - धर्मा प्रॉडक्शनटी निर्मिती असलेल्या या चित्रपटातील आर माधवनचं एक जबरदस्त पोस्टर अलीकडेच रिलीज झालं होतं. यामध्ये तो वकिलाच्या गणवेशात दिसत होता. यामध्ये त्याचा अतिशय करारी लूक दिसला आहे. 'केसरी - चॅप्टर २' मध्ये आर माधवन हा नेव्हिल मॅकिन्लीच्या भूमिकेत वावरणार आहे. १८ एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होईल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्या एकमेकांविरुद्ध कोर्टात लढताना पाहणं मनोरंजक असणार आहे.

अनन्या पांडेचा फर्स्ट लूकही आला समोर - आर माधवनबरोबरच निर्मात्यांनी अनन्या पांडेचा फर्स्ट लूक देखील रिलीज केलं आहे. यीमध्ये ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. अनन्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना निर्मात्यांनी सांगितलं की, न्यायासाठी धडपडणाऱ्या दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे.

२०१९ मध्ये केसरी हा चित्रपट रिलीज झाला होता. सारागढीच्या लढाईवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याच्या संगीताला चाहत्यांनीही दाद दिली होती. आता, 'केसरी २' च्या पहिल्या झलकमध्ये, जालियनवाला हत्याकांडाची झलक दाखवण्यात आली आहे. या हत्याकांडाचं गूढ उकलण्यासाठी अक्षय कुमार 'केसरी २' मध्ये प्रयत्ना करताना दिसणार आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.