ETV Bharat / entertainment

पोरगीच्या चेहऱ्यावरुन ढळली नाही कार्तिक आर्यनची नजर, म्हणतो "तू मेरी जिंदगी है..." - KARTIK AARYAN WITH SRILEELA

कार्तिक आर्यननं सोशल मीडियावर श्रीलीलाबरोबरचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. दोघंही चहाच्या मळ्यात बसून प्रेमाच्या गप्पा मारताना दिसताहेत.

KARTIK AARYAN WITH SRILEELA
कार्तिक आर्यन श्रीलीला (@kartikaaryan/Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 28, 2025 at 4:19 PM IST

1 Min Read

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यनननं त्याच्या इन्स्टग्रामवर श्रीलीला बरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. एका रोमँटिक चित्रपटात दोघंही एकत्र काम करत आहेत. या सिनेमाचं शीर्षक अजून ठरलेलं नाही. त्याच चित्रपटातील दोघांचा हा एक फोटो आहे. यामध्ये कार्तिक आणि श्रीलीला हे प्रेमी जोडपं चहाच्या मळ्यात बसल्याचं दिसत असून एकमेकांच्या डोळ्यात ते प्रेमानं पाहात आहेत.

श्रीलीलाच्या चेहऱ्यावरुन हटली नाही कार्तिकची नजर - कार्तिक आणि श्रीलीलाच्या या रोमँटिक फोटोमध्ये दोघांच्या समोर चहाचा ग्लास दिसत आहे. यात श्रीलीलाची नजर खाली असून, तिच्याकडं प्रेमानं पाहात असलेल्या कार्तिकची नजर तिच्या चेहऱ्यावरुन हटताना दिसत नाही. या फोटोला कार्तिकनं कॅप्शन दिलंय, "तू मेरी जिंदगी है." ही ओळ आशिकी चित्रपटातील लोकप्रिय गाण्याचं शीर्षक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या त्याच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या टीझरच्या मागेही हे गाणेच होते.

आर्यन आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या पश्चिम बंगालमधील सिलिगुडीमध्ये आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. यातले त्यांचे काही फोटोही व्हायरल झालेत. यातील एका फोटोत कार्तिक बाईक चालवताना दिसत आहे. चित्रपटाच्या सेटवरील दुसऱ्या फोटोत त्याच्या हातावरील जखमेवर पट्टी बांधलेली दिसत आहे.

'आशिकी ३' शीर्षक बदललं - अनुराग बसू दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचं नाव आधी 'आशिकी ३' असं ठरलं होतं. परंतु, हे शीर्षक कायदेशीर होणार नसल्यामुळं याबाबत टी सिरीजला कळवणं भाग पडलं. या वर्षाच्या सुरुवातील या चित्रपटाची एक झलक टिझरमधून दिसली होती. यामध्ये स्टेवर एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स देत असलेली गायिका 'तू जिंदगी है' हे गीत गात असल्याचं दिसली होती.

या चित्रपटाबद्दल अजूनही फारशी माहिती समोर आलेली नसली तरी याची कथा 'आशिकी' सिनेमाप्रमाणेच एक रोमँटिक ड्रामा असलेली प्रेमकथा असणार आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीपर्यंत रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी दिवाळीला कर्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.