'मेट्रो इन डिनो'च्या स्क्रिनिंगमध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खानमधील गोंडस क्षण, व्हिडिओ व्हायरल
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कार्तिक हा अभिनेत्रीला मीठी मारताना दिसत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : July 4, 2025 at 10:45 AM IST
मुंबई - २०२५ हे बॉलिवूडसाठी खूप चांगलं ठरलं आहे. दरम्यान हे वर्ष सारा अली खानसाठी देखील खूप विशेष आहे. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीनं अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटात काम केलं. आता वर्षाच्या मध्यभागी तिचा दुसरा चित्रपट 'मेट्रो इन डिनो' प्रदर्शित होणार आहे. ४ जुलै रोजी, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा,अनुपम खेर , नीना गुप्ता, पंकज कपूर, अली फजल आणि फातिमा सना शेख हे कलाकारही दिसले आहेत. दरम्यान या चित्रपटाचं स्क्रिनिंग काल रात्री म्हणजेच ३ जून रोजी मुंबईत झालं. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सामील झाले होते. या चित्रपटामध्ये ७ स्टार्सची वेगवेगळी कहाणी दाखवली गेली आहे.
'मेट्रो इन डिनो'च्या स्क्रिनिंग कार्तिक आर्यन हजर : या स्क्रिनिंग कार्यक्रमादरम्यान, सारा अली खाननं पांढरा सूट परिधान केला होता. पार्टीत साराचा भाऊ इब्राहिम अली खान देखील तिला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला होता. या पार्टीमध्ये कार्तिक कोणताही संकोच न करता या स्क्रिनिंगला पोहोचला होता. तसेच तो सारा अली खानबरोबर वेळ घालवताना दिसला. दोघांमधील गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये या दोन्ही स्टार्सला एकत्र पाहूण चाहते म्हणताना दिसत आहेत की, कदाचित ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असतील. या दोघांना एकत्र पाहूण साराचे आणि कार्तिकचे चाहते खूप खुश असल्याचे दिसत आहेत.
कार्तिक आणि साराचा गोंडस क्षण : दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कार्तिक आर्यन व्हाईट, ब्राऊन आणि ब्लू रंग संगतीच्या पट्टेदार टी-शर्टमध्ये दिसत आहे. तो साराकडे येतो आणि तिला मीठी मारतो. यादरम्यान, सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान देखील तिच्या शेजारी उभा आहे. कार्तिक आणि सारामध्ये गप्पा होतात. त्यानंतर रसिका दुग्गल मागून तिथे पोहोचते आणि कार्तिक तिला मीठी मारून बोलू लागतो. सारा अली खान देखील रसिकाशी बोलते. त्यानंतर कार्तिक साराचा हात धरून पुढं जाताना दिसतो. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका चाहत्यानं लिहिलं, 'तो ज्या पद्धतीनं तिचा हात धरून तिला आपल्या बाजूला घेऊन जातोय ते छान आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सारा पुन्हा कार्तिकच्या प्रेमात पडली आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'कार्तिक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तिच्या गालाला स्पर्श करत होता, मात्र इब्राहिमला पाहूण दोघांनीही स्वतःवर नियंत्रण ठेवलं.' आता या पोस्टवर अनेकजण हॉर्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा :

