'भूल भुलैया 4'बरोबर 'रूह बाबा' पुन्हा परततोय! कार्तिक आर्यननं दिला मोठा इशारा...
कार्तिक आर्यननं रुही बाबा अवतारात भितीदायक बाहुलीसह एक फोटो पोस्ट केला, ज्यामुळं 'भूल भुलैया 4'ची घोषणा होईल असं म्हटलं जात आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 26, 2025 at 3:18 PM IST
मुंबई - 'भूल भुलैया' फ्रँचायझीमधील सर्व चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. पहिल्या भागात या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. यानंतर कार्तिकनं 'भूल भुलैया २' आणि 'भूल भुलैया ३' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. कार्तिक अभिनीत हे दोन्ही चित्रपट चाहत्यांना खूप पसंत पडले होते. आता अनेकजण 'भूल भुलैया ४'च्या अपडेटची पाहात आहेत. कार्तिकनं त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो 'भूल भुलैया' चित्रपटामधील लूकमध्ये दिसत आहे. आता अनेकजण 'भूल भुलैया ४'ची निर्मिती केली जाईल, याबद्दल अंदाज लावताना दिसत आहेत. दरम्यान फोटोमध्ये कार्तिक 'रू बाबा'चा पोशाख घालून असून त्याच्या हातात एक वूडू बाहुली असल्याची दिसत आहे.
कार्तिक आर्यनची पोस्ट : कार्तिकनं ही पोस्ट शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'आय लबुबू यू' याशिवाय त्यानं पोस्टमध्ये लव्हचे हँड सिंबल दिले आहे. आता त्याच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं कार्तिकच्या पोस्टवर लिहिलं, 'भूल भुलैया ३' विश्वाचा राजकुमार.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'रू बाबा'ला मंजुलिका खूप जास्त आवडते.' आणखी एकानं या पोस्टवर लिहिलं,' मला असं वाटत आहे की, 'भूल भुलैया ४' हा चित्रपट घोषीत होणार आहे. ' याशिवाय अनेकांनी या पोस्टवर हॉर्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. आता अनेकजण सोशल मीडियावर हा प्रश्न विचारत आहे की, खरच 'भूल भुलैया ४' या चित्रपटाची घोषणा होईल का ? सध्या कार्तिक हा त्याच्या आगामी चित्रपटामुळं चर्चेत आहे.
कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट : तो करण जोहरच्या 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या क्रोएशियामध्ये होत आहे. दरम्यान 'भूल भुलैया' फ्रँचायझीनं आतापर्यंत 'भूल भुलैया ४'ची अधिकृत घोषणा केला नाही. कार्तिक आर्यन स्टारर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' १३ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'आशिकी ३', 'पत्नी पत्नी और वो २', 'नागजिला' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :

