ETV Bharat / entertainment

'रूह बाबा'नंतर आता कार्तिक आर्यन बनला 'इच्छाधारी नाग', या दिवशी थिएटरमध्ये उगारणार फणा...!

अभिनेता कार्तिक आर्यननं करण जोहरच्या बॅनरखाली निर्मित असलेल्या 'नागजिला'ची घोषणा करून चाहत्यांना खुश केलं आहे.

kartik aaryan and naagzilla film
कार्तिक आर्यन आणि 'नागजिला' चित्रपट (नागजिला: (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 22, 2025 at 1:14 PM IST

|

Updated : April 22, 2025 at 3:02 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यननं करण जोहरच्या बॅनरखाली निर्मित होणाऱ्या त्याच्या नवीन चित्रपट 'नागजिला'ची घोषणा केली आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या दीर्घ यशस्वी चित्रपट कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान 'नागजिला' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करताना कार्तिक आर्यननं सांगितलं आहे की, 'इच्छाधारी नागकडे, रूप बदलण्याची शक्ती असते, माझ्यासारखा, प्रियंवदेश्वर प्यारे चंद, वय ६३१ वर्षे, तुम्ही माणसांचे अनेक चित्रपट पाहिले असतील, आता सापांसह असलेले चित्रपट पाहा, मी नागपंचमीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये माझा फन पसरवण्यासाठी येत आहे.' कार्तिकचा हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. 'नागजिला' चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'फुकरे'सारखी यशस्वी चित्रपट मालिका बनवली आहे.

रुपेरी पडद्यावर दिसणार इच्छाधारी नाग : 'नागजिला' या चित्रपटाद्वारे कार्तिक हा पहिल्यांदाच इच्छाधारी नागाची भूमिका साकारणार आहे. आता रुपेरी पडद्यावर इच्छाधारी नाग बनून कार्तिक पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी येत आहे. मृगदीप सिंग लांबानं ज्या पद्धतीनं 'नागजिला'चे मोशन पोस्टर रिलीज केलंय, यात कार्तिकचा आवाज असल्यानं प्रेक्षकांना या अलौकिक चित्रपटात अद्भुत विनोदही पाहायला मिळेल असं यावरून दिसत आहे. दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यन एकेकाळी करण जोहरबरोबरच्या भांडणामुळे चर्चेत होता. कार्तिकनं अचानक 'दोस्ताना २' सोडल्यानंतर भांडण झाल्याची बातमी समोर आली होती.

करण जोहर आणि कार्तिकचं भांडण : करण जोहरशी शत्रुत्व बाळगणे कार्तिक आर्यनला महागात पडेल असं चित्रपटसृष्टीत मानले जात होते, मात्र असं काहीही झालं नाही. कार्तिक आर्यननं एकामागून एक यशस्वी चित्रपट देत आहे. यामुळे करण जोहर त्याच्यापासून प्रभावित झाला आहे. आता करण जोहरचे बॅनर कार्तिकबरोबर सतत चित्रपट बनवत आहे. 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'नंतर कार्तिक आणि करण पुन्हा एकत्र काम करणार आहेत. आता या चित्रपटाबद्दल देखील चाहते खूप उत्सुक आहेत. 'नागजिला'मध्ये कार्तिकचा आणखी एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. पोरगीच्या चेहऱ्यावरुन ढळली नाही कार्तिक आर्यनची नजर, म्हणतो "तू मेरी जिंदगी है..."
  2. सर्पदोष दूर करण्यासाठी कॅटरिना कैफ पोहोचली कर्नाटकातील कुक्के सुब्रह्मण्य मंदिरामध्ये, पाहा व्हिडिओ
  3. 2025च्या आयफा स्टेजवर कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यन यांनी केला 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर डान्स...
Last Updated : April 22, 2025 at 3:02 PM IST