मुंबई - कपिल शर्मानं नुकताच त्याचा पुढचा चित्रपट 'किस किसको प्यार करूं 2'ची घोषणा केली आहे. या चित्रपटात त्याच्या तीन बायका आणि एक गर्लफ्रेंड असणार आहे. सध्या या चित्रपटामधील कपिलच्या वधूचे चेहरे समोर आलेले नाहीत. आता रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये कपिल हा पंजाबी वराच्या भूमिकेत दिसत आहे. कपिलनं त्याच्या आगामी चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह सर्वांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये कपिल शर्मा एका पंजाबी वधूबरोबर पोझ देत आहे. आता कपिलनं शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कपिलनं 'किस किसको प्यार करूं 2'मधील पोस्टर शेअर करत पोस्टवर लिहिलं, 'तुम्हा सर्वांना वैशाखीच्या खूप खूप शुभेच्छा.'
'किस किसको प्यार करूं 2'मधील पोस्टर रिलीज : आता कपिलच्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'तुमच्या चित्रपटाची वाट पाहत आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हा चित्रपट सुपरहिट होणार आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'यावेळी कपिल वेगवेगळ्या धर्मांच्या मुलीबरोबर लग्न करू शकतो.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून कपिलला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. कपिल शर्मा आणि मनजोत सिंग अभिनीत, 'किस किसको प्यार करूं 2' हा विनोद चित्रपट आहे. यावेळी पहिल्या भागाप्रमाणे चित्रपटामध्ये गोंधळ पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस धमाकेदार कमाई करेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे.
'किस किसका प्यार करूं 2' चित्रपटाबद्दल : 'किस किसको प्यार करूं 2' चित्रपटाचं दिग्दर्शन अनुकल्पा गोस्वामी यांनी केलं आहे, तर रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास-मस्तान यांनी व्हीनस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट अंतर्गत आणि अब्बास मस्तान फिल्म प्रॉडक्शन्सच्या सहकार्यानं चित्रपटाची निर्मिती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री पारुल गुलाटी, आश्रम फेम बबिता भाभी म्हणजेच त्रिधा चौधरी आणि बिग बॉस फेम अभिनेत्री आयशा खान या कपिलच्या तिन्ही पत्नींची भूमिका करू शकतात. सध्या 'किस किसको प्यार करूं 2' या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत. यापूर्वी देखील कपिलच्या या चित्रपटातील दोन पोस्टर रिलीज झाले होते. एका पोस्टरमध्ये तो मुस्लिम वरच्या भूमिकेत होता. याशिवाय दुसऱ्या पोस्टरमध्ये तो हिंदू वराच्या भूमिकेत होता.
हेही वाचा :