मुंबई: विष्णु मांचू स्टारर पौराणिक चित्रपट 'कन्नप्पा' 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. काही कारणामुळे 'कन्नप्पा'च्या प्रदर्शन तारीख अधिकृतपणे बदलण्यात आली होती. आता निर्मात्यांनी अधिकृतपणे नवीन रिलीज तारीख जाहीर केली आहे. लखनौ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर झालेल्या एका खास बैठकीत ही घोषणा करण्यात आली, जिथे चित्रपटाच्या टीमनं एक आकर्षक पोस्टर लॉन्च करून चित्रपटातील एक झलक दाखवली. चित्रपटाची नवीन रिलीज तारीख 27 जून 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. 'कन्नप्पा'च्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये झालेल्या विलंबामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आला होती.
'कन्नप्पा' चित्रपटाबद्दल? : मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित हा चित्रपट भगवान शिवाचा एक समर्पित भक्त 'कन्नप्पा'वर आधारित आहे. ही कहाणी 'कन्नप्पा' नावाच्या एका नास्तिक शिकारीची आहे, जो शिवाचा उत्कट भक्त बनतो. तो भक्तीत मग्न होऊन जातो. तो भक्तीत आपले डोळे सुद्धा देवाला अर्पण करतो. या चित्रपटात विष्णु मांचू 'कन्नप्पा'ची मुख्य भूमिका साकारत आहेत.
Met one of my favorite Hero Sri. @myogiadityanath ji. He was gracious to launch the date announcement poster of #Kannappa. Gifted him a painting of Ramesh Gorijala. Such a Humble and powerful aura he has.
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) April 9, 2025
Kannappa on June 27th. #HarHarMahadev pic.twitter.com/8zBF2nZ828
योगी आदित्यनाथ यांच्याशी खास भेट : दरम्यान एक्सवर पोस्ट शेअर करताना, तरण आदर्श यांनी लिहिलं, 'विष्णू मांचूच्या संपूर्ण भारतात प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नप्पा' चित्रपटाला नवीन रिलीज तारीख मिळाली. तुमचे कॅलेंडर चिन्हांकित करा. कन्नप्पा - ऐतिहासिक अॅक्शन गाथा - आता 27 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.' तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या एका खास भेटीदरम्यान निर्मात्यांनी नवीन प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाला भेट देताना, विष्णू मांचू, मोहन बाबू, प्रभु देवा आणि विनय महेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांना काही भेटवस्तू दिल्या. मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर स्वाक्षरी केली आणि त्यांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिवाची भूमिका साकारत आहे, तर काजल अग्रवाल देवी पार्वतीची भूमिका साकारत आहे. मोहनलाल आणि प्रभास कॅमिओमध्ये दिसतील. याशिवाय या चित्रपटात सरथ कुमार, मधु आणि ब्रह्मानंदम सहाय्यक भूमिकेत आहेत.
हेही वाचा :