ETV Bharat / entertainment

विनेश फोगटच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक विजयावर कंगना रणौतनं दिली वादग्रस्त प्रतिक्रिया - Paris Olympic 2024

Paris Olympic 2024 : विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यानंतर अनेकजण तिचं कौतुक सोशल मीडियाच्या माध्यामातून करत आहे. आता अभिनेत्री कंगना रणौतनं विनेश फोगटविषयी वादग्रस्त विधान केलंय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 11:33 AM IST

Updated : Aug 7, 2024, 4:12 PM IST

Paris Olympic 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ((AP PHOTOS))

मुंबई Paris Olympic 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं मंगळवार 6 ऑगस्ट रोजी इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. विनेशनं उपांत्य फेरीच्या सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. विनेश आता बुधवारी 7 ऑगस्ट रोजी रात्री अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडशी सुवर्णपदकासाठी झुंज देईल. आता प्रत्येक भारतीयाला तिच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान विनेशच्या विजयानंतर प्रत्येक भारतीय खूप आनंदी आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्यावर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.

Paris Olympic 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Kangana Ranaut - instagram)

कंगना रणौतचं विनेश फोगटबाबत वादग्रस्त विधान : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना रणौतनं विनेशचं अभिनंदन न करता तिची सोशल मीडियाच्या माध्यामातून खरडपट्टी काढली आहे. कंगनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विनेशचा एक फोटो शेअर करुन एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिनं लिहिलं, "फिंगर क्रॉस, भारताच्या पहिल्या सुवर्णपदकासाठी...विनेश फोगटनं एकदा एका निषेधात भाग घेतला होता, जिथं तिनं मोदीविरोधी घोषणा दिल्या. तरीही तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि सर्वोत्तम प्रशिक्षण आणि प्रशिक्षक देण्यात आले. हे लोकशाहीचं सौंदर्य आणि एका महान नेत्याची ओळख आहे." कंगनानं विनेशच्या जिंकण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.

कंगनानं केलं स्वत:साठी संकट उभं : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून जिंकल्यानंतर कंगना आता भाजपाची खासदार आहे. त्यामुळे ती अनेकदा आपलं मत देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून मांडत असते. तिच्या अनेकदा वादग्रस्त विधानामुळे ती खूपदा सोशल मीडियावर ट्रोल देखील झाली आहे. यापूर्वी कंगना चंदीगड विमानतळावरुन दिल्लीला रवाना होत होती. त्यावेळी तपासणीदरम्यान सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौरनं कंगनाच्या कानशीलात लगावली. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत कंगनाच्या वक्तव्यामुळे कुलविंदर दुखावल्याचं सांगण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा कंगनानं विनेशच्या जिंकण्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन एक संकट उभं केलं आहे.

हेही वाचा :

  1. गुरु पौर्णिमानिमित्त कंगना रणौतनं तिच्या बालपणीच्या गुरुची झलक केली शेअर, झाली ट्रोल - Guru Purnima
  2. कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED
  3. खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan

Last Updated : Aug 7, 2024, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.