मुंबई : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनं बुधवार, 9 एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं साऊथ चित्रपटसृष्टीतील पॉवर स्टार आणि राजकारणी पवन कल्याण यांचा मुलगा सिंगापूरमधील त्यांच्या शाळेत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या घटनेदरम्यान, पवन कल्याणचा धाकटा मुलगा मार्क शंकर याला हात आणि पायांना दुखापत झाली आहे. आता या घटनेनंतर मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हे त्यांचे भाऊ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याबरोबर सिंगापूरला गेले आहेत. बुधवारी, ज्युनियर एनटीआरनं त्यांच्या ऑफिशियल एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पवन कल्याणच्या मुलासाठी एक पोस्ट शेअर केली. एनटीआरनं पवन कल्याणच्या मुलासाठी प्रार्थना करत पोस्टमध्ये लिहिलं, 'सिंगापूरमध्ये आगीच्या दुर्घटनेत मार्क शंकर अडकल्याचं ऐकून दुःख झालं. मी त्यांच्या मुलाच्या लवकर बरे होण्याकरिता प्रार्थना करतो. लहान योद्धा, खंबीर राहा. पवन कल्याण गारू आणि कुटुंबाला शक्ती आणि प्रार्थना.'
पवन कल्याण आणि चिरंजीवी : गेल्या मंगळवारी पवन कल्याण त्यांचा भाऊ चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हैदराबाद विमानतळावर दिसले. दरम्यान मार्कवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 एप्रिल रोजी माध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी खुलासा केला की, त्यांच्या मुलाला धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं ब्रॉन्कोस्कोपी करावी लागेल. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं, "त्यांची ब्रॉन्कोस्कोपी सुरू आहे. त्याला नॉर्मल एनेस्थीसिया दिली जाईल. थोडी चिंताजनक गोष्ट म्हणजे धूर श्वासानं आत घेतल्यानं त्याच्या शरीरावर खोलवर परिणाम होऊ शकतो." आता भारतातील सिंगापूरच्या उच्चायुक्तालयानेही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, "जी काही मदत लागेल ती दिली जाईल." पवन कल्याण यांचा मुलगा सात वर्षांचा आहे.
Saddened to hear about Mark Shankar being caught in a fire mishap in Singapore. Wishing him a speedy recovery. Stay strong ,little warrior ! Strength and prayers to Shri @PawanKalyan garu and family.
— Jr NTR (@tarak9999) April 9, 2025
4 प्रौढ आणि 15 मुले रुग्णालयात दाखल : मंगळवारी सकाळी सिंगापूरमधील रिव्हर व्हॅली रोडवरील एका दुकानात आग लागल्यानंतर किमान 4 प्रौढ आणि 15 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं सिंगापूरच्या सरकारी मालकीच्या सीएनएनं, सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्स (एससीडीएफ) च्या हवाल्यात सांगण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये पवन कल्याण यांचा धाकटा मुलगा मार्क कल्याण यांचा समावेश आहे. एका अधिकृत निवेदनात, म्हटलं गेलं आहे की 'आगीत शंकरच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे आणि मुलाला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.'
#WATCH | Hyderabad, Telangana: On his younger son Mark Kalyan sustaining injuries in a fire accident in Singapore, Andhra Pradesh Dy CM Pawan Kalyan says, " he is going through bronchoscopy. he will be on general anasthesia. the problem is it will have a long term impact... my… pic.twitter.com/8MxZpI3EEC
— ANI (@ANI) April 8, 2025
पवन कल्याणचं लग्न : पवन कल्याणनं 2013 मध्ये अॅना लेझनेवाशी लग्न केलं होतं. हे त्यांचे तिसरे लग्न आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत - मुलगा मार्क आणि मुलगी पोलेना अंजना पवनोवा. पवन कल्याण यांना त्यांची दुसरी पत्नी रेणू देसाई हिच्यापासून एक मुलगा अकिरा नंदन आणि एक मुलगी अधवा आहे, जिच्याशी त्यांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला होता.
हेही वाचा :