दिलजीत दोसांझला दिलं जावेद अख्तरनं समर्थन, 'सरदार जी ३'साठी केलं 'हे' विधान...
दिलजीत दोसांझ स्टारर 'सरदार जी ३' हा चित्रपपट परदेशात रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी दिलजीतवर अनेकजण टीका करत आहे, आता जावेद अख्तरनं गायकाचे समर्थन केलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 28, 2025 at 5:32 PM IST
मुंबई - अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या 'सरदार जी ३' या चित्रपटामुळं वादातच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिसत आहे. त्यामुळं हा वाद निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्याची बंदी घालण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला उत्तर दिलं होतं. दरम्यान 'सरदार जी ३' या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर असल्यानं अनेकजण दिलजीतवर नाराज झाले आहेत. दिलजीतला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. यामध्ये काही पंजाबी गायकांनी त्याला देशद्रोही असंही म्हटलं होतं. याशिवाय काही चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं दिलजीतला पाठिंबा दिला होता.
'सरदार जी ३'साठी जावेद अख्तरनं केलं दिलजीत दोसांझचं समर्थन : आता या संदर्भात पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अलीकडेच दिलजीतच्या समर्थनार्थ म्हटलं, "सरदार जी ३' या चित्रपटाचे शूटिंग हे पहलगाम हल्ल्यापूर्वी झाले. यानंतर तो बिचारा काय करणार आहे. त्याला असे थोडे माहित होते की, असं काही घडेल. या चित्रपटासाठी पाकिस्तानी माणसाचे पैसे जाणार नाही, भारताच्या माणसाचे पैसे जातील. आता मग याचा काय फायदा ? हा जर दिलजीला असं काही माहित असते की, असं काही घडणार आहे, तर त्यानं पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतलं नसते. मला असं वाटते की, सेन्सॉर बोर्डानं या प्रकरणात थोडी सहानुभूती दाखवली पाहिजे आणि त्यानं असं पुन्हा करू नये, असं त्याला सांगायला पाहिजे, आता या चित्रपटाचं आधी शूटिंग झालं आहे, तर तो प्रदर्शित करा. मात्र असं पुन्हा घडू नये."
'सरदार जी ३' पाकिस्तानमध्येही झाला प्रदर्शित : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले होते. याशिवाय पाकिस्तानी कलाकारांनी देखील भारताविषयी सोशल मीडियावर खूप काही वाईट म्हटलं होतं. तसेच या घटनेनंतर फक्त दोन महिन्यांनी, दिलजीतनं 'सरदार जी ३' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, यामध्ये हानिया आमिरच्या उपस्थितीमुळं सोशल मीडियावर गोंधळ उडाला होता. हा चित्रपट भारतात रिलीज होऊ दिला नाही. 'सरदार जी ३' हा चित्रपट २७ जून रोजी परदेशात प्रदर्शित झाला आहे. याशिवाय 'सरदार जी ३ ' हा पाकिस्तानमध्येही प्रदर्शित झाला आहे.
Sardaarji 3, starring Diljit Dosanjh, Hania Aamir, and Neeru Bajwa, is all set to release in Pakistan and overseas, except in India, on June 27th.#Sardaarji3 #HaniaAamir #DiljitDosanjh #NeeruBajwa #LollywoodPictures pic.twitter.com/764x5D6Syh
— Lollywood Pictures (@LollyPictures) June 23, 2025
हेही वाचा :
- दिलजीत दोसांझ स्टारर 'सरदार जी ३'वर काळे ढग, चित्रपट पाकिस्तानमध्ये रिलीज होईल ?
- पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम केल्याबद्दल बी प्राकनं दिलजीत दोसांझला मारले टोमणे ? पोस्ट व्हायरल...
- दिलजीत दोसांझ सापडला वादाच्या भोवऱ्यात, 'सरदार जी ३' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर असल्यामुळं झाली समस्या...

