ETV Bharat / entertainment

दिग्गज अभिनेता इरफान खानला अभिनेता होण्यापूर्वी क्रिकेटर बनायचं होतं, 'या' कारणामुळं राहिलं स्वप्न अपूर्ण... - IRRFAN KHAN DEATH ANNIVERSARY

अभिनयात करिअर करण्यापूर्वी इरफान खानला क्रिकेटर व्हायचं होतं. आज स्मृती दिननिमित्त आम्ही त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

इरफान खान
irrfan khan (इरफान खान (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 29, 2025 at 2:40 PM IST

2 Min Read

मुंबई : जागतिक चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडणारा भारतातील दिग्गज अभिनेता इरफान खानचा आज २९ एप्रिल रोजी स्मृती दिन आहे. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. इरफान खाननं हिंदी चित्रपटांसह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र इरफानचे पहिलं स्वप्न अभिनेता होण्याचे नव्हते, तर क्रिकेटर होण्याचे होते. त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि नंतर त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली, यामध्ये त्यानं प्रभुत्व मिळलं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या आयुष्याशी संबंधित आम्ही तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. इरफान खानचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी राजस्थानमधील टोंक येथे पश्तून कुटुंबात झाला.

इरफान खानबद्दल : इरफान खानचं खानची आई सईदा बेगम खान टोंकची होती आणि वडील यासीन अली खान राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील खजुरिया गावचे होते. त्याचा टायरचा व्यवसाय होता. इरफान खानचे बालपण टोंकमध्ये आणि नंतर जयपूरमध्ये गेले. इरफान खानला क्रिकेटमध्ये रस होता. त्याला अंडर-२३ गटातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी होणाऱ्या सीके नायडू ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेकडे भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिले जाते. एक चांगला क्रिकेट खेळाडू असूनही आणि सीके नायडू ट्रॉफी खेळण्यासाठी निवड झाल्यानंतरही, इरफान खानचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

इरफान खाननं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं : यामागील कारण हे पैशाची कमतरता होती. इरफानच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय असल्यानं, त्याला प्रवास खर्च परवडत नसल्यान, तो या ट्रॉफी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. यामुळे त्याचे क्रिकेटचे स्वप्न अपूर्ण राहिले. काही काळानंतर, त्याच्या मामामुळे त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्याचे मामा जोधपूरमध्ये एक थिएटर आर्टिस्ट होते. त्यांनी इरफानची जयपूरमधील प्रसिद्ध नाट्य कलाकारांशी ओळख करून दिली. त्यानंतर त्यानं शहरात अनेक स्टेज परफॉर्मन्स केले. यानंतर इरफाननं १९८४ मध्ये अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. याशिवाय त्यानं प्रवेश घेण्यापूर्वी जयपूरमध्ये एमए पूर्ण केलं. आज इरफान खान आपल्यात नाही, मात्र ते त्याच्या चित्रपटाद्वारे जिवंत आहे.

इरफानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट

  • सलाम बॉम्बे
  • लाइफ इन अ मेट्रो
  • सात खून माफ
  • लाइफ ऑफ पाई
  • मकबूल
  • पीकू
  • हिंदी मीडियम
  • मदारी
  • द लंच बॉक्स
  • पान सिंह तोमर
  • हैदर
  • कारवां
  • जुरैसिक वर्ल्ड
  • तलवार
  • करीब करीब सिंगल
  • ब्लैकमेल
  • स्लमडॉग मिलेनियर

हेही वाचा :

  1. राजेश खन्नाच्या घरी एसी दुरुस्त करणारा, फॅनच्या दुकानातील मेकॅनिक बनला सुपरस्टार...!
  2. दिवंगत अभिनेता इरफान खानचा जन्मदिन, विशेष दिवशी जाणून घ्या अभिनेत्याबद्दल रंजक गोष्टी...
  3. दीपिका पदुकोण, बिग बी आणि इरफान खान स्टारर 'पिकू'ला नऊ वर्षे पूर्ण - deepika padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.