मुंबई - 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, कृतिका देव, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, सावली कदम, शिवराज वाळवेकर आणि इतर कलाकार झळकणार आहेत. 8 एप्रिल रोजी या चित्रपटामधील 'पावट्याने कल्ला केला' गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं खूप दमदार आणि मजेशीर आहे. या गाण्याला अनेकजण पसंत करत आहेत.
'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'मधील गाणं रिलीज : 'पावट्याने कल्ला केला' हे गाणं भारती माधवी यांनी गायलं आहे. या गाण्याला संगीत विजय नारायण गावंडे यांनी दिलंय. दरम्यान 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' चित्रपटाचे निर्माते नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी आहेत. याशिवाय सहनिर्माते विजय नारायण गावंडे आणि श्रीकांत देसाई आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता रिलीज झालेलं गाण्याबद्दल खूप चर्चा होत आहे. एका यूजरनं या गाण्याबद्दल लिहिलं, 'एकच नंबर यात्रेत हेच, गाणं वाजणार, कडक.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'अप्रतिम खतरनाक गाणं.' आणखी एकानं लिहिलं, 'गाणं खूपच भारी आहे.' याशिवाय काहीजण या गाण्याच्या पोस्टमध्ये फायर आणि हार्ट शेअर करत आहेत.
'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' चित्रपट कधी होणार रिलीज : शिक्षण, समाज आणि राजकारणाचा अनोखा मेळ असलेल्या - 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या चित्रपटात कहाणी खूप मनोरंजक असणार आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' चित्रपटामध्ये शिक्षणव्यवस्था आणि समाजकारण याचा अनोखा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटामध्ये धमाकेदार कॉमेडी असेल. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' मधून प्रेक्षकांना गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांची हटके केमिस्ट्री अनुभवायला मिळेल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांभाळली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट 11 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.
हेही वाचा :