ETV Bharat / entertainment

आयफातील शाहिद-करीनाच्या पुनर्मिलनानंतर इम्तियाज अलीनं 'जब वी मेट'च्या सीक्वेलबद्दल केलं विधान...

आयफा 2025मध्ये शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या पुनर्मिलनानंतर लोक आता 'जब वी मेट'च्या सीक्वेलबद्दल विचारत असल्याचं इम्तियाज अली यांनी सांगितलं आहे.

shahid kapoor - Kareena kapoor and Imtiaz Ali
शाहिद कपूर - करीना कपूर आणि इम्तियाज अली (Imtiaz Ali on Shahid-Kareena Reunion at IIFA 2025 (Photo: IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 13, 2025 at 5:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांनी अलीकडेच त्यांच्या 2007च्या 'जब वी मेट' चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल एक विधान केलं आहे. जयपूरमधील आयफा 2025मध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार शाहिद कपूर आणि करीना कपूर खान हे एकत्र दिसल्यानंतर अनेक चाहत्यांनी 'जब वी मेट' चित्रपटाच्या सीक्वेलबद्दलची मागणी केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी शाहिद कपूर आणि करीना कपूरला एकत्र पाहण्याची आपली इच्छा देखील व्यक्ती केली होती. 'जब वी मेट' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील शाहिद आणि करीनाचा अभिनय खूप धमाकेदार होता. दरम्यान आयफा पुरस्कार सोहळ्यात शाहिद आणि करीनानं एकमेंकाबरोबर संवाद केल्यानंतर दोघेही चर्चेत आले होते.

शाहिद आणि करीनाचा 'जब वी मेट' चर्चेत : शाहिद आणि करीना यांनी या कार्यक्रमात एकामेंकांना मीठी मारली होती. एकेकाळी हे दोघेही डेट करत होते. दरम्यान हा कार्यक्रम झाल्यानंतर शाहिदनं स्पष्ट केलं होतं की, अशा भेटी त्यांच्यासाठी अगदी सामान्य आहेत. मात्र तरीही चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता इम्तियाज अली यांनी एक विधान केलं आहे. त्याचे हे विधान देखील चर्चेत आलं आहे. इम्तियाज अली यांनी म्हटलं, "शाहिद आणि करीनाची आयफामध्ये भेट झाली आणि लोक माझ्याशी 'जब वी मेट'बद्दल बोलत आहेत, हे मला खूप मनोरंजक वाटतं आहे. शाहिदला वाटते की, मी पुढं गेलो आहे. तसेच मला वाटते की प्रत्येकजण पुढे गेले आहेत. 'जब वी मेट'ला बराच काळ झाला आहे."

शाहिद आणि करीनाचं वैयक्तिक आयुष्य : पुढं त्यांनी म्हटलं, "मला वाटते की, आपण या चित्रपटाचा त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, तसेच सीक्वेल बनवून आपण ते अजिबात खराब करू नये, मी खरोखर शाहिद आणि करीनासह चित्रपटाची योजना आखत नाही, परंतु ते भेटले हे खूप छान आहे." तसेच त्यांनी शाहिद आणि करिना उत्कृष्ट कलाकार असल्याचं म्हटलं. दरम्यान 'जब वी मेट' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना आणि शाहिद वेगळे झाले होते. या चित्रपटानंतर करीनानं सैफ अली खानला 5 वर्षे डेट केलं. यानंतर तिनं 2012मध्ये सैफबरोबर लग्न केलं. या जोडप्याला दोन मुले आहेत. तसेच शाहिदनं देखील 2015मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. या दोघांना मीशा नावाची मुलगी आणि झैन नावाचा मुलगा आहे.

हेही वाचा :

  1. कुशाग्र अभिनेता म्हणून 'जब वी मेट'मध्ये आसिफ यांना कास्ट केले - इम्तियाज अली
  2. करिनाने शेअर केला 'जब वी मेट' च्या सेटवरील फोटो
  3. 'माय मेलबर्न' : कबीर, इम्तियाज, रीमा आणि ओनीर चौकडीची व्हिक्टोरियन टीमसोबत हातमिळवणी