ETV Bharat / entertainment

ना मेगास्टारचा ना सुपरस्टारचा, २०२५ चा सर्वाधिक अपेक्षित चित्रपट बनला देसी स्टारचा, पाहा टॉप १० चित्रपटांची यादी

IMDb ने सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका देसी स्टारचा चित्रपट सर्वात अव्वल स्थानी आहे.

IMDB MOST ANTICIPATED MOVIES
२०२५ चा सर्वाधिक अपेक्षित चित्रपट ('कंतारा ए लीजेंड: चैप्टर 1' (Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 9:06 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच IMDb नं यंदाच्या सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर ज्याचं नाव आहे त्याचा नायक ना मेगास्टार आहे ना सुपरस्टार. याच नायकाचा २०२२ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचा आता प्रीक्वेल यावर्षी रिलीज होणार आहे. याच चित्रपटानं आयएमडीबीच्या सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे.

आयएमडीबीनं अलीकडेच २०२५ च्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत एका कन्नड अभिनेता-दिग्दर्शकाच्या चित्रपटानं पहिले स्थान मिळवलं आहे. हा कन्नड अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ शेट्टी आहे. होय, ऋषभ शेट्टीचा आगामी चित्रपट आयएमडीबीच्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटाच्या सर्वात वरच्या स्थानवर आहे.

IMDB MOST ANTICIPATED MOVIES
२०२५ चा सर्वाधिक अपेक्षित चित्रपट (IMDb लिस्ट (IMDb website))

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळालं. चित्रपटाचं यश पाहून निर्मात्यांनी 'कांतारा अ लीजेंड: चॅप्टर १' या प्रीक्वेलची घोषणा केली. याची निर्मिती आता सुरू असून यंदाच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल तमाम चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

२०२५ मधील आयएमडीबीच्या यादीतील सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपट - २०२५ मधील आयएमडीबीच्या सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीनुसार 'कांतारा अ लेजेंड: चॅप्टर १' हा चित्रपट अव्वल स्थानावर आहे. या बहुप्रतिक्षित प्रीक्वलनं आगामी काळातील मोठ्या रिलीजनाही मागं टाकलंय. या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. ऋषभ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार, आर. माधवन यांचा कोर्टरूम ड्रामा 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आयएमडीबीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे 'रेट्रो', 'रेड २' आणि 'कुली' हे चित्रपट आहेत. तर 'वॉर २' सारखी चित्रपट सहाव्या, 'ठग लाईफ' ७ व्या आणि 'द राजा साब' हे चित्रपट ८ व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा -