मुंबई - ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'वॉर २'चा टीझर आज २० मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आज, ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त, 'वॉर २'च्या निर्मात्यांनी टीझर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित होताच हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या चित्रपटाचा हा टीझर खूप अनेकांना आवडला आहे. या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर खूप धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. दरम्यान 'वॉर २' चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण खूप दिवसांपासून वाट पाहात आहेत.
'वॉर २'चा टीझर : 'वॉर २'मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. आता 'वॉर २' चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर आमनेसामने येताना दिसणार आहेत. दरम्यान २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशनच्या 'वॉर'चा हा सीक्वेल आहे. 'वॉर २'चित्रपटात हृतिक पुन्हा एकदा रॉ एजंट कबीरच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ज्युनियर एनटीआर चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. यश राज स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे.
'वॉर २' चित्रपटाबद्दल : आता 'वॉर २'चा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यासाठी आता काही आठवडे बाकी आहेत. दरम्यान 'वॉर २'च्या टीझरमध्ये तर हृतिक रोशन ज्युनियर एनटीआरबरोबर टक्कर देताना दिसला आहे. 'वॉर २' चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या देशांमध्ये १५० दिवसांच्या कालावधीत झाली आहे. 'वॉर २'साठी इटली, अबू धाबी, स्पेन, जपान, रशिया आणि भारत अशा सहा वेगवेगळ्या देशांमध्ये सेट तयार करण्यात आले होते. 'वॉर २'मध्ये धमाकेदार अॅक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :