मुंबई : अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांचा मल्टीस्टारर क्राइम कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल ५' प्रदर्शित होण्यासाठी आता दोन दिवस उरले आहेत. हा चित्रपट ६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधी, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'हाऊसफुल ५' किती पुढं पोहोचला आहे आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाई किती करणार आहे यावर एक नजर टाकूया. आता या आगामी चित्रपटाकडून अक्षय कुमार आणि त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. हा मल्टीस्टारर क्राइम कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना किती हसवणार हे काही दिवसात समजेल.
'हाऊसफुल ५' अॅडव्हान्स बुकिंग : दरम्यान चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर फिल्म ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, देशभरात हिंदीमध्ये १०५४९ शोसाठी ७०७०६ तिकिटे विकून या चित्रपटानं २.१५ कोटी रुपये कमावले आहेत. ब्लॉक सीट्ससह, हा आकडा ५.७ कोटी रुपये आहे. या चित्रपटानं एनसीआर भागात सर्वाधिक १६.५४ लाख रुपयांची तिकिटे विकली आहेत. त्यानंतर, मुंबईत ११.४३ लाख, बेंगळुरूमध्ये १.८४ लाख, पुण्यात ६.३२ लाख, हैदराबादमध्ये ४.२७ लाख, कोलकातामध्ये १.५२ लाख रुपये कमावले आहेत.
'हाऊसफुल ५' हा चित्रपट टॉप ३मध्ये समाविष्ट होईल का? : २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, 'छावा', 'सिकंदर', 'रेड २', 'स्काय फोर्स' आणि 'जाट' यांनी आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे आणि आता 'हाऊसफुल ५'चे नावही यादीत जोडले जात आहे. आज ४ जून रोजी 'हाऊसफुल ५' हा चित्रपट प्री-सेल्समध्ये 'जाट'च्या अॅडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड मोडू शकतो.
चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगची कमाई
- छावा - १३.८५ कोटी रुपये
- सिकंदर - १०.०९ कोटी रुपये
- रेड २ - ६.५२ कोटी रुपये
- स्काय फोर्स - ३.८२ कोटी रुपये
- जाट - २.५९ कोटी रुपये
हाऊसफुल ५ - २.१५ कोटी रुपये (कमाई सुरूच आहे...).
'हाऊसफुल ५'च्या असणार दोन वेगवेगळ्या एंडिंग : 'हाऊसफुल ५' हा चित्रपट दोन स्वरूपात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे 'हाऊसफुल ५' चित्रपट प्रेक्षकांना एक नवीन सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. हा चित्रपट 'हाऊसफुल ५ए' आणि 'हाऊसफुल ५बी' स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाचे किलर आणि एंडिंग वेगवेगळे असतील. आता अक्षय कुमारचे अनेक चाहते त्याचा हा आगामी चित्रपट पाहाण्यासाठी आतुर आहेत.
हेही वाचा :