मुंबई : स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेली टीव्ही अभिनेत्री हिना खाननं तिच्या बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप लग्न केलं आहे. ४ जून रोजी, हिना खाननं सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करत तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. हिनाच्या घोषणेमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले. आता तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा देत आहेत. हिना खाननं बुधवार, ४ जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. हिनाच्या लग्नात फक्त तिच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हिना आणि रॉकी जयस्वाल हे बराच काळांपासून एकमेकांना डेट करत होते. हे दोघेही चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
हिना खाननं केलं लग्न : टीव्ही अभिनेत्रीने हिना खाननं तिच्या इंस्टाग्रामवर एक नोटही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'दोन वेगवेगळ्या जगातून, आम्ही प्रेमाचे विश्व निर्माण केले. आमचे मतभेद मिटले, आमची मन एक झालं, एक असे बंधन निर्माण झाले, जे आयुष्यभर टिकेल. आता आमचे घर, आमची आशा एकत्र आहे. आम्ही सर्व अडथळ्यांवर मात केली आहे. आज, आमचे मिलन प्रेम कायद्यात कायमचे बंद झाले आहे. पत्नी आणि पती म्हणून आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.' आता हिनाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
सेलिब्रिटींनी नवविवाहित जोडप्याचं केलं अभिनंदन : लग्नातील फोटो समोर आल्यानंतर, सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहेत. प्रसिद्ध निर्माती एकता कपूरनं पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'सर्वात चांगली बातमी, आतापर्यंतची सर्वात गोंडस जोडी.' मलायका अरोरा, गौहर खान, सोहा अली खान, जरीन खान, बिपाशा बसू, अंकिता लोखंडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी नवविवाहित जोडप्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांचा पोशाख : हिना खाननं तिच्या लग्नात ओपल हिरव्या रंगाची हँडलूम साडी नेसली होती. या साडीवर सोने आणि चांदीच्या धाग्यांनी विणलेली डिझायन होती. तसेच हलक्या लाल रंगाची बॉर्डर आणि जरदोजीनं भरतकाम यावर केलं होतं. याशिवाय तिनं फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेले दागिने परिधान केले होते. दुसरीकडे रॉकीनं लग्नासाठी मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला साधा व्हाइट चिकन कुर्ता घातला होता. दरम्यान शेअर केलेल्या फोटोमध्ये नवविवाहित जोडपे सुंदर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. तसेच एका फोटोमध्ये हे जोडपे लग्नाची नोंदणी करताना दिसत आहे. या फोटोवरून पुष्टी होते की या जोडप्यानं त्यांचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नोंदणीकृत लग्न केलंय.
हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांची पहिली भेट : हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांची भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर झाली होती. हिनानं या मालिकेत अक्षराची भूमिका साकारली होती आणि रॉकी हा त्याचा सुपरवाइजिंग प्रोड्यूसर होता. या दोघांची मैत्री सेटवर झाली, यानंतर त्यांचे नाते प्रेमात रूपांतरित झाले. २०१७ मध्ये या जोडप्यानं त्यांचे नाते जगासमोर जाहीर केले.
हेही वाचा :