ETV Bharat / entertainment

'बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल'मध्ये प्रीमियर झालेला 'घात' हा चित्रपट येतोय आता प्रेक्षकांच्या भेटीला - Ghaat

Ghaat Movie : 'घात' चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. हा चित्रपट लवकरच भारतात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 6:31 PM IST

Ghaat Movie
घात चित्रपट (Instagram)

मुंबई - Ghaat Movie : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला. छत्रपाल निनावे यांचा 'घात' हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये रिलीज होत आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलातला हा सिनेमा मनोरंजक असणार आहे. हा चित्रपट माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलीस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर आधारित आहे. शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'घात' चित्रपटाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाची सिनेमेटोग्राफी उदित खुराणा यांनी केली आहे. नेटफ्लिक्सवरची 'द हंट फॉर वीरप्पन' ही डॉक्युमेंट्री तसेच हुमा कुरेशी स्टारर 'बयान' असे तगडे प्रोजेक्ट त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहेत.

छत्रपाल निनावे चित्रपटासाठी उत्सुक : भारतातील रिलीजबद्दल लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे विशेष उत्सुक आहे. "घात हा एक खोल आशय असलेला चित्रपट आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा, 'घात' महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे, पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद, धोका दडलेला असू शकतो, तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कहाणी भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे. 'घात', जिथे विश्वास दुर्मीळ आहे आणि तिथल्या जीवाची किंमत पावलापावलावर मोजावी लागते."

'घात'ची प्रचंड प्रसिद्धी : 'घात' या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. यानंतर या चित्रपटाला लॅब अवॉर्ड मिळालं. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील जीडब्लूएफएफ (GWFF) बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठी या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर जिओ मामी 2023 (Jio MAMI) आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयएफएफके (IFFK)मध्ये झाला. चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा यांनी या चित्रपटाबाबत म्हटलं, "घात' हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा 'घात' हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल, असा मला विश्वास आहे." 90 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला 'न्यूटन', राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता 'पिकासो', मराठी जापनीज रॉमकॉम 'तो, ती आणि फुजी' आणि हुमा कुरेशीचा आगामी 'बयान'आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे.

स्वप्न ऑस्करचं : 'घात' सिनेमाच्या टीमनं थेट ऑस्करचं स्वप्न पाहिलं आहे. भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी या चित्रपटाचे प्रयत्न सुरू आहेत. 27 सप्टेंबर 2024 ला सिनेमा सपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसंच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. 'घात'शी जोडली गेलेली नावं अत्यंत प्रतिष्ठित आहेत. 'घात' चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी म्हटलं, "कधीतरी जीवघेणा तर जीव वाचवणाऱ्या विश्वासाच्या नाजुक नात्यावर 'घात' चित्रपटाची कहाणी आधारित आहे. 'घात' या शब्दाचे मराठीत दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विश्वासघात आणि दुसरा म्हणजे हल्ला. नातेसंबंधातील विश्वासघातातून मानवी मनावर होणाऱ्या एकप्रकारच्या हल्ल्याचा, दगाफटक्याचा हा प्रवास आहे. महाराष्ट्रातल्या दुर्गम आणि अनवट पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा असं आयुष्य दाखवतो, जिथे चांगल्या वाईटातली सीमारेषा धूसर आहे. पिढ्यानपिढ्या, या प्रदेशातील स्थानिकांनी त्यांची जमीन, पाणी आणि जंगल याचं रक्षण केलय.

छत्रपाल निनावे : छत्रपाल निनावे एक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. 2022 मध्ये, छत्रपाल हे बर्लिनेल टॅलेंटचा भाग होते. 'घात' हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. पण या पहिल्या फीचर फिल्मनं 2020 मध्ये एनएफडीसी (NFDC) फिल्म बाजार येथे डब्लूआयपी (WIP) लॅब अवॉर्ड जिंकला, तर बर्लिनमध्ये पॅनोरमा 2023 मध्येही चित्रपटाची निवड झाली होती. याशिवाय या जीडब्लूएफएफ (GWFF) फर्स्ट फीचर फिल्म अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले होते. छत्रपाल यांनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 15 वा Giuseppe Becce पुरस्कार पटकावला. जीओ मामी ( Jio MAMI) आणि आयएफएफके IFFK आणि एइआयएफएफ (AEIFF) मध्ये देखील 'घात'ची निवड झाली होती. याबरोबरच छत्रपाल यांनी 'अ चेक ऑफ डेथ' (2007) ही मध्ये भारतातील शेतकरी आत्महत्या प्रकरणावर आधारित एक शॉर्टफिल्मही केली आहे. 'फिल्माका इंडिया' स्पर्धेत या फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.

'प्लॅटून वन आणि शिलादित्य बोराबद्दल : मुंबईत मुख्यालय असलेले, 'प्लॅटून वन' हे शिलादित्य बोरा यांनी स्थापन केलेला एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. या बॅनरनं आजवर 85 हून अधिक चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित केलेले आहेत. बोरा हे प्रतिष्ठित 'बर्लिनेल टॅलेंट्स 2015' चे माजी विद्यार्थीसुद्धा आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि निर्मितीच्या सर्व अंगांशी संबंधित कामगिरी केली आहे. दिग्दर्शन, निर्मिती, विपणन, वितरणापासून ते एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करेपर्यंत अनेक भूमिका बोरा यांनी पार पाडल्या आहेत. 'कोर्ट', 'मसान', 'न्यूटन', 'एसआयआर' यांसारख्या ऑफबीट सिनेमांबरोबर बोरा गेल्या दशकातील सर्वोत्तम भारतीय स्वतंत्र सिनेमांशी निगडीत आहेत. 'प्लॅटून वन'चा आगामी चित्रपट, हुमा कुरेशी अभिनीत 'बयान' हा सिनेमा एलए रेसिडेन्सी ऑफ ग्लोबल मीडिया मेकर्स - फिल्म इंडिपेंडंट येथे तयार झाला आहे. याच सिनेमानं 'ह्युबर्ट बाल्स' फंडाचं विजेतेपदही पटकावलं आहे. नुकतंच सिनेमाचं मुख्य छायाचित्रण पूर्ण झालं आहे. 'प्लॅटून वन' उत्तर अमेरिकन बाजारपेठेतही आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ओकलँड कॅलिफोर्निया येथे 'प्लॅटून वन इंक'नं आपली धमाकेदार एंट्री केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.