ETV Bharat / entertainment

भारतात पहिल्यांदाच 'कीर्तनावर आधारित' रिअ‍ॅलिटी शो, 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'!! - KIRTAN REALITY SHOW

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शो पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

KIRTAN REALITY SHOW
कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शो (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 26, 2025 at 2:53 PM IST

Updated : March 26, 2025 at 3:19 PM IST

1 Min Read

मुंबई - मनोरंजक वाहिन्यांच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं अनोख्या विषयावरी शो सुरू करण्याची चढाओढ सुरू असते. आजवर ज्या विषयावर रिअ‍ॅलिटी शो झालेला नाही त्यावर लोकांचं मनोरंजन होईल का याचा विचार टीव्ही इंडस्ट्रीतील क्रिएटिव्ह लोक करत असतात. भारतीय प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन देशी विषयावरील शो निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. कौन बनेगा करोडपती, बिग बॉस, सिंगिग टॅलेंट हंट, रोडीज, फियर फॅक्टरसारख्या जगभर गाजलेल्या टीव्हीशोवर आधारित अनेक रिअ‍ॅलिटी शो भारतात लोकप्रिय ठरले. परंचु, आता मराठी टीव्ही वाहिनीवर एक अनोखा रिअ‍ॅलिटी शो सुरू होणार आहे. सोनी मराठीनं जाहीर केलंय की, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा आगामी रिअ‍ॅलिटी स्पर्धा शो एप्रिलमध्ये प्रसारित होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या शोचं अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. "महाराष्ट्रासाठी फार समृद्ध आध्यात्मिक वारसा नेहमीच ताकद राहिला आहे आणि कीर्तन हे त्या वारशाचे केंद्रबिंदू आहे. भक्ती आणि कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक पिढ्यांना शिक्षित, उन्नत केलं आहे आणि एकत्र आणलं आहे. या परंपरेचा सन्मान करणारं व्यासपीठ तयार केल्याबद्दल मी सोनी मराठीचे कौतुक करतो आणि त्याचबरोबर ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवतो. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा केवळ एक कार्यक्रम नाही तर एक सांस्कृतिक चळवळ आहे जी आपला पवित्र वारसा जिवंत आणि समृद्ध ठेवेल," असे सोनीच्या टीमनं एक निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.

ही स्पर्धा १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांतील १०८ सहभागी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे परीक्षक ह.भ.प. राधाताई सानप आणि ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील असणार आहेत. तर लोकप्रिय गीतकार ईश्वर अंधारे या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमसाठी ज्येष्ट संतसाहित्याचे अभ्यासक आणि इतिहासतज्ञ डॉ. सदानंद मोरे याचंही मार्गदर्शन असणार आहे. दरम्यान, हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार सोमवार ते सोमवार सोनी मराठीवर १ एप्रिलपासून प्रसारित होईल.

हेही वाचा -

Last Updated : March 26, 2025 at 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.