ETV Bharat / entertainment

अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या व्हायरल व्हिडिओबाबत आता सत्य आलं समोर - AISHWARYA BACHCHAN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 2:16 PM IST

Abhishek Aishwarya 'Divorce' Viral Video : अभिषेक बच्चनचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो जुलैमध्ये पत्नी ऐश्वर्या राय बच्चनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगताना दिसत आहे. ईटीव्ही भारतनं या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य तुमच्यासमोर आणलं आहे. वाचा सविस्तर...

Abhishek Aishwarya 'Divorce' Viral Video
अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोटाबाबतचा व्हिडिओ व्हायरल (अभिषेक-ऐश्वर्या (ANI))

मुंबई - Abhishek Aishwarya 'Divorce' Viral Video : बॉलिवूड स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बच्चन कुटुंबात वाद झाल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन घरातून बाहेर पडले होते. यानंतर अभिषेक आणि ऐश यांच्या घटस्फोटाबाबतच्या बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. सोशल मीडियावर या जोडप्याच्या घटस्फोटाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मुलीबरोबर आनंदानं राहात आहेत. दरम्यान, आणखी एका व्हायरल व्हिडिओनं या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीला हवा दिली आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य : वास्तविक हा व्हिडिओ बनावट असल्याचं स्पष्ट होत आहे. या बनावट व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनच्या आवाजात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 'या जुलैमध्ये मी आणि ऐश्वर्यानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं गेलं आहे. ही व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतरच ती पूर्णपणे बनावट असल्याचं समजतं. अभिषेक बच्चनचा हा व्हायरल फेक व्हिडिओ ऐश्वर्या रायच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. आता ईटीव्ही भारतला अभिषेक बच्चनचा मूळ व्हिडिओ सापडला आहे. हा व्हिडिओ अभिषेक बच्चनच्या इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. अभिषेक बच्चनची ही व्हिडिओ पोस्ट 7 नोव्हेंबर 2022 ची आहे.

अभिषेक-ऐशच्या घटस्फोटाची बातमी का पसरली : या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन 'नन्ही कली' या सामाजिक मदत उपक्रमाबद्दल सांगताना दिसत आहे. यामध्ये भारतातील मुलींचं शिक्षण आणि आदराबाबत सांगितलं आहे. अभिषेक बच्चनच्या या पोस्टला तापसी पन्नूनेही पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी या फेक व्हायरल व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. जुलैमध्ये मुकेश अंबानी यांची मुलगा अनंत अंबानीनं त्यांची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटबरोबर लग्न केलं. या लग्नात संपूर्ण बॉलिवूड एका छताखाली जमलं होतं. बच्चन कुटुंबानंही या ठिकाणी हजेरी लावली होती. मात्र या फंक्शनमध्ये ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबापासून वेगळी दिसली. यानंतर सोशल मीडियावर या जोडप्याच्या घटस्फोटाबाबतची बातमी जोरदार पसरली होती. या व्हिडिओचं नेमकं सत्य बाहेर आलं आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल त्या दोघांपैकी एक किंवा बच्चन कुटुंबाकडून जोपर्यंत काही सांगितलं जात नाही. तोपर्यंत असे व्हिडिओ येतच राहणार. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी आणि त्यांच्या फॅन्सनी जरा चोखंदळपणेच अशा रिल्स पाहायला पाहिजेत. नाही का?

हेही वाचा :

  1. AbhiAsh Marriage Anniversary : एकमेकांना साथ देत अभिषेक ऐश्वर्यानी पार केली विवाहित जीवनाची 16वर्षे...
  2. अभिषेक बच्चनला आहे ऐश्वर्या रायसोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची इच्छा
  3. 'आयुष्य कधीच सोपं नसतं' म्हणत अमिताभ बच्चननं लिहिली गूढ पोस्ट - Amitabh Bachchan share cryptic post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.