ETV Bharat / entertainment

इमरान हाश्मी - सई ताम्हणकर स्टारर 'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज, पाहा दमदार अ‍ॅक्शन... - ZERO MOVIE TEASER OUT

इमरान हाश्मी - सई ताम्हणकर अभिनीत 'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

ground zero movie teaser out
'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज (इमरान हाश्मी (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : March 28, 2025 at 5:33 PM IST

1 Min Read

मुंबई : रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) यांनी आज 28 मार्च रोजी अ‍ॅक्शन थ्रिलर 'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज केला आहे. आता या चित्रपटाचा टीझर सलमान खान स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'सिकंदर'सोबत थिएटरमध्ये दाखविल्या जाणार आहे. 'ग्राउंड झिरो' चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तीव्र सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. 'ग्राउंड झिरो'मध्ये इमरान हाश्मी एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी बीएसएफचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे यांच्याभोवती फिरते, जे दोन वर्षांपासून हाई-स्टेक्स नेशनल सिक्योरिटी थ्रेट धोक्याची चौकशी करतात.

'ग्राउंड झिरो'चा टीझर रिलीज : वर्षानुवर्षे लोकांच्या नजरेपासून लपून राहिलेल्या एका अकथित लढाईबद्दल या चित्रपटात दाखवले जाणार आहे. नरेंद्र नाथ दुबे यांचं मिशन हे बीएसएफच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम ऑपरेशन्सपैकी एक आहे. 2003 मध्ये दहशतवादी प्रमुख गाजी बाबा ठार मारणाऱ्या ऑपरेशनचं नेतृत्व दुबे यांनी केलं होतं. त्यांना 2005मध्ये अब्दुल कलाम यांनी कीर्ती चक्र प्रदान करून सन्मानित केलं होतं. 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केलं आहे. उच्च-अ‍ॅक्शन आणि भावनेनं परिपूर्ण, ही कहाणी फक्त युद्धभूमीपुरती मर्यादित नाही तर सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांनी दिलेल्या वैयक्तिक बलिदानाचेही प्रदर्शन करेल. हा चित्रपट सैन्याची आवड, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या जीवनातील न पाहिलेले पैलू समोर आणण्याचे आश्वासन देते.

'ग्राउंड झिरो' चित्रपटामधील स्टार कास्ट : एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला आणि तेजस देवस्कर दिग्दर्शित, 'ग्राउंड झिरो' हा एक शक्तिशाली अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. 'लक्ष्य' चित्रपटसारखा उत्तम चित्रपट देणाऱ्या निर्मात्यांकडून मिळणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे त्याचे चाहते आता खुश आहेत. इमरान हाश्मीला या भूमिकेत पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी व्यतिरिक्त सई ताम्हणकर, मुकेश तिवारी,झोया हुसेन, ललित प्रभाकर आणि एकलव्य तोमर हे कलाकार असणार आहेत.

हेही वाचा :

  1. 46व्या वाढदिवशी इमरान हाश्मीनं 'आवारापन 2'ची केली घोषणा, टीझर रिलीज...
  2. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; जखम पाहून घाबरले चाहते
  3. Emraan Hashmi : सारा अली खान स्टारर 'ऐ वतन मेरे वतन' मधील इमरान हाश्मीचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.