ETV Bharat / entertainment

३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये चित्रपटाचं प्रीमियर, 'ग्राउंड झिरो' स्टार इमरान हाश्मी घाटीत पोहोचला... - GROUND ZERO SCREENING IN SRINAGAR

श्रीनगरमध्ये ३८ वर्षांनंतर चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. हा इतिहास इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' या चित्रपटाद्वारे रचला जाणार आहे.

ground zero
'ग्राउंड झिरो' (इमरान हाशमी (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 18, 2025 at 3:44 PM IST

1 Min Read

मुंबई : 'ग्राउंड झिरो' आज १८ एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये रेड कार्पेटवर प्रीमियरसह इतिहास रचण्यास सज्ज आहे. गेल्या ३८ वर्षांत श्रीनगरमध्ये कोणताही चित्रपटाचं प्रीमियर झालेलं नाही. हा चित्रपट प्रथम सीमेवर उभे राहून आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना दाखवला जाईल. हे पाऊल केवळ चित्रपटाच्या देशभक्तीच्या थीमचं प्रतिबिंबित करत नाही, तर खऱ्या नायकांसाठी ही खरी आदरांजली आहे. दरम्यान, इमरान हाश्मीनं श्रीनगरला पोहोचल्या नंतरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. इमरान हाश्मीनं श्रीनगरमधील फोटो शेअर करत लिहिलं होतं, 'ग्राउंड झिरो टचडाऊन.. ऐतिहासिक दिवस, ३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये पहिलं रेड कार्पेट चित्रपट प्रदर्शन, बीएसएफ सैनिक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ या एका विशेष चित्रपटाचे प्रदर्शन आहे.'

'ग्राउंड झिरो' चित्रपटाचं प्रीमियर : 'ग्राउंड झिरो' अ‍ॅक्शन चित्रपटाबद्दल आता दिवसेंदिवस क्रेझ वाढत आहे. 'ग्राउंड झिरो'ला सध्या सोशल मीडियाच्या माध्यामातून खूप प्रेम मिळत आहे. अनेकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल उत्सुक आहेत. बीएसएफच्या पाठिंब्यानं प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचेही खूप कौतुक होतं आहे. या चित्रपटामध्ये इमरानसह मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

'ग्राउंड झिरो' चित्रपट कधी होणार रिलीज : तसेच या घटेनेबद्दल सांगायचं झालं तर, गाझी बाबा हा जैश-ए-मोहम्मदचा एक टॉप कमांडर आणि हरकत-उल-अंसार नावाच्या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर होता. त्याला १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार मानले जाते. दरम्यान रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट तेजस देवस्कर यांनी दिग्दर्शित केला आहे. कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अरहान बगती, तालिसमन फिल्म्स, अभिषेक कुमार आणि निशिकांत रॉय हे त्याचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. श्रीनगरमध्ये 'ग्राऊंड झिरो' चित्रपटाचं होणार रेड कार्पेट प्रीमियर...
  2. सई ताम्हणकर आणि इम्रान हाश्मी स्टारर सत्यकथेवर आधारित 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज
  3. इमरान हाश्मी स्टारर 'ग्राउंड झीरो' चित्रपटात सई ताम्हणकर दिसणार विशेष भूमिकेत, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.