मुंबई : चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा आणि रणबीर कपूर, कतरिना कैफ अभिनीत राजकीय थ्रिलर चित्रपट 'राजनीती'ला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रकाश झा यांचा 'राजनीती' हा चित्रपट आजच्याच दिवशी म्हणजेच ४ जून २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त, दिग्दर्शकानं या चित्रपटाचा सीक्वेल जाहीर केला आहे. चित्रपट निर्माते प्रकाश झा यांचा 'राजनीती' (२०१०) हा चित्रपट त्याच्या कहाणीमुळे, मोठ्या स्टारकास्टमुळे आणि यशस्वी साउंडट्रॅकमुळे खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाला महाभारताचे आधुनिक रूपांतर मानले जात होते. या चित्रपटात रणबीर कपूर कतरिना कैफ, नाना पाटेकर, अजय देवगण, अर्जुन रामपाल , मनोज वाजपेयी , सारा थॉम्पसन आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार दिसले आहेत.
'राजनीती' चित्रपटाचा सीक्वेल : 'राजनीती' चित्रपटाच्या १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांचा राजकीय थ्रिलर चित्रपट का खास होता असं सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी 'राजनीती'च्या सीक्वेलवर काम करत असल्याचेही माहिती आता दिली आहे. 'राजनीती २'बद्दल एका मुलाखतीत बोलताना म्हटलं, "राजनीती'चा प्रवास सतत सुरूच राहतो, तो सुरूच राहिल. 'राजनीती २'साठी नेहमीच एक योजना होती. कास्टिंग आणि शूटिंगच्या बाबतीत अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही. पण मी सध्या त्यावर काम करत आहे. आम्ही एका गर्दीच्या दृश्यासाठी ८००० कलाकारांची निवड केली, जे खूप कठीण काम होतं."
प्रकाश झानं व्यक्त केल्या भावना : त्यांनी पुढं सांगितलं, "कास्टिंगमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांच्याशी संपर्क साधला त्यांना पटकथा आवडली आणि ते त्यात सहभागी झाले. त्यांना चांगले काम करण्याचे आव्हानही हे वाटले. लोक म्हणतात की ते व्यावसायिक यश होते. माझ्यासाठी, 'दामुल' (१९८४), 'मृत्युदंड' (१९९७), 'गंगाजल' (२००३), 'अपहरण' (२००५) आणि 'सत्याग्रह' (२०१३) हे फक्त चित्रपट आहेत. मात्र जेव्हाही या चित्रपटाबद्दल लोक बोलतात तेव्हा ते चांगले वाटते." 'राजनीती' या चित्रपटावर सध्या वेगान काम सुरू आहे. आता या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत दिसणार ही माहिती सध्या समोर आलेली नाही.
हेही वाचा :