ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं रिलीजसाठी सज्ज - devera part 1

Dheere Dheere Second Single : ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत 'देवरा पार्ट 1'चं 'धीरे धीरे' दुसरे सिंगल आज रिलीज होणार आहे. आता निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 1:14 PM IST

Dheere Dheere Second Single
धीरे धीरे दुसरे सिंगल (देवरा पार्ट 1'चं गाणं 'धीरे-धीरे' (IMAGE- Song Poster))

मुंबई - Dheere Dheere Second Single : ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधीन दुसरे गाणे 'धीरे धीरे' (हिंदी) आज 5 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. हे गाणं रोमँटिक असणार आहे. आता गाण्याच्या पोस्टवरून वाटत आहे की, या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्यात रोमान्सही पाहायला मिळेल. आज 5 ऑगस्ट रोजी 'देवरा पार्ट 1' चित्रपटाच्या निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या जोडीचे रोमँटिक पोस्टर शेअर करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. आता अनेक चाहते पोस्टच्या कमेंट विभागात उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

गाणं कधी होईल रिलीज : 'देवरा पार्ट 1' चित्रपटाचे निर्माते युवसुधा आर्ट्सनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ज्युनियर एटीआर हा जान्हवी कपूरचा हात धरून आहे. 'देवरा पार्ट 1' च्या निर्मात्याने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचेही संकेत दिले आहेत. तेलुगूमध्ये हे गाणं 'छत्तमले', तर हिंदीत 'धीरे धीरे', तामिळमध्ये 'पथथ अवेक्कुम', कन्नडमध्ये 'स्वाथिमुथे सिकंगथे' आणि मल्याळममध्ये 'कन्निनाथन कामोनोतम' असे आहे. 'धीरे धीरे' गाण्याला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजून 04 मिनिटांनी हे गाणं रिलीज होईल. 'देवरा पार्ट 1' चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

'देवरा पार्ट 1' कधी प्रदर्शित होईल : कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो पुढं हृतिक रोशनबरोबर 'वॉर 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे जान्हवीचा सध्या बॉक्स ऑफिसवर 'उलझ ' हा चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच ती पुढं 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'तख्त' आणि 'नानी 33'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1'मध्ये बॉबी देओलची एन्ट्री, ज्युनियर एनटीआरशी देणार लढत - Bobby Deol in Devra
  2. जूनियर एनटीआर आणि प्रशांत नील 'ड्रॅगन' चित्रपटात करणार एकत्र काम - Jr NTR Next Film is Dragon
  3. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.