मुंबई - १९९८ साली प्रदर्शित झालेल्या सलमान खान आणि काजोल अभिनित 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटात धर्मेंद्र आणि अरबाज खान यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका होत्या, ज्या विशेष लक्षवेधी ठरल्या. या चित्रपटात अरबाज खाननं काजोलचा रागीट भाऊ विशालची भूमिका साकारली होती, ज्यात रौद्र आणि प्रेमळ अशा दोन छटा होत्या. तो आपल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणावर नाराज असतो आणि तिचे रक्षण करण्यासाठी काहीही करायला तयार असतो. याच चित्रपटात धर्मेंद्र यांनी काजोल आणि अरबाजचा शेतकरी काका सुरजभान यांची भूमिका साकारली होती. त्यांचा सहज अभिनय आणि संवादशैली प्रेक्षकांना भावली होती. या काकांच्या भूमिकेत त्यांनी प्रेम, विनोद आणि गंभीरतेचा सुरेख समतोल साधला होता. अरबाजच्या रौद्र स्वभावाचा धर्मेंद्र सौम्यतेनं सामना करतात. या दोघांमधील भावनिक आणि संवादप्रधान प्रसंगांनी चित्रपटाला चांगली उठावदारता दिली होती. या चित्रपटाच्या यशात धर्मेंद्र आणि अरबाज खान यांच्या सशक्त भूमिकांचाही मोलाचा वाटा होता.
'मैने प्यार किया फिर से'मध्ये दिसणार धर्मेंद्र आणि अरबाज खान : आता हे दोघेही पुन्हा एकत्र येणार असल्याची अलीकडील बातमी चाहत्यांसाठी विशेष आनंददायक आहे. हो. तब्बल २७ वर्षांनी धर्मेंद्र आणि अरबाज खान 'मैने प्यार किया फिर से' या आगामी हिंदी चित्रपटातून एकत्र येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. एक योगायोगाची गोष्ट म्हणजे 'मैने प्यार किया'मध्ये प्रमुख भूमिकेत सलमान खान होता आणि 'मैने प्यार किया फिर से'मध्ये त्याचा भाऊ अरबाज खान शीर्षक भूमिकेत आहे. अजून एक योगायोग म्हणजे धर्मेंद्र आणि अरबाज खान यांच्या या दोन्ही चित्रपटांच्या टायटलमध्ये 'प्यार' कॉमन आहे. दरम्यान 'मैने प्यार किया फिर से'च्या घोषणा कार्यक्रमात धर्मेंद्र, अरबाज खान, उदित नारायण, विद्या माळवदे, कोरियोग्राफर गणेश आचार्य, संगीतकार दिलीप सेन, फाईट मास्टर सोनू बग्गड, ब्राईट आऊटडोअरचे योगेश लाखानी, कंगना शर्मा, दीपक तिजोरी, गीतकार सुधाकर शर्मा आणि राजपाल यादव उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन साबीर शेख करीत असून पटकथा निसार अख्तर यांनी लिहिली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार द्वयी दिलीप सेन-समीर सेन या चित्रपटाद्वारे कमबॅक करीत आहेत.








'मैने प्यार किया फिर से' चित्रपटाबद्दल : पीबीसी मोशन पिक्चर प्रा ली या बॅनर खाली 'मैने प्यार किया फिर से'ची निर्मिती होत असून निर्माते आहेत रॉनी रॉड्रिग्स. कथा आणि गीते त्यांनीच लिहिली असून नुकतेच एक गाणे उदित नारायण यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम हे या चित्रपटाचे सहनिर्माते (Associate Producer) आहेत.
हेही वाचा :
- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अरबाज खाननं पत्नी शुरावर केला प्रेमाचा वर्षाव, पाहा रोमँटिक फोटो
- मलायका अरोराच्या वडिलांच्या प्रार्थनासभेत अरबाज खानसह स्टार्सनं वाहिली श्रद्धांजली - Arbaaz Khan Attends Prayer Meet
- मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अरबाज खान पत्नी शूराबरोबर पोहोचला, व्हिडिओ व्हायरल - Malaika Arora