मुंबई - 'गदर 2'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर, सनी देओल त्याच्या 'जाट' या अॅक्शन चित्रपटासह परतला आहे. या चित्रपटामध्ये त्यानं दमदार भूमिका केली आहे. 'जाट' चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार सिंग हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. दरम्यान 'जाट'च्या रिलीज होण्याआधी या चित्रपटाचा प्रीमियर इव्हेंट झाला, ज्यामध्ये कलाकार आणि क्रू तसेच सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमामधील आता धरम पाजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पाजी खूप खुश असल्याचे दिसत आहे.
'जाट'च्या स्क्रिनिंगमध्ये धर्मेंद्रचा डान्स : व्हिडिओमध्ये 'जाट'च्या स्क्रिनिंगमध्ये धर्मेंद्र रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोझ देताना दिसले. यावेळी त्यांनी ढोलकीच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आता त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. यावेळी धरम पाजीनं प्रिंटेड काळ्या शर्टसह पॅन्ट परिधान केला होता. यावर त्यांनी टोपी घातली होती. दरम्यान या व्हिडिओच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'जुने हे सोने आहे.' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'देखणा व्यक्ती, धरम पाजीला पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते.' आणखी एकानं लिहिलं, 'धरम पाजी तुम्ही हीरो नंबर वन आहात.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
#jaat #jaattrailer @MythriOfficial @iamsunnydeol @megopichand @LegendDeols started . What a start and build up for #RandeepHooda and #SunnyDeol entry. Pakka mass face off hoga pic.twitter.com/gzYvMwZllj
— ravish jain (@ravish9370) April 10, 2025
#jaatmovie Block buster 💥💥
— Mani (@teja_vms) April 10, 2025
1st Blockbuster in Bollywood for @megopichand garu
Hatrick For You Sir 👌❣️#Krack #VeeraSimhaReddy #Jaat @iamsunnydeol Performance 🥵@meramyakrishnan @ReginaCassandra Have done good Job @MusicThaman 💯💯 Mad Max BGM in action sequences
Autom… pic.twitter.com/bkLFZWwGci
@MythriOfficial @iamsunnydeol #Jaat #jaattrailer @LegendDeols interval. Its going to be dhamaka in 2nd half . Atleast better than #Sikandar. No faltu romance , no faltu songs . On point from starting jo audience ko dekhna hain. Action ..action and action. Love you @iamsunnydeol pic.twitter.com/ozkw99SsdE
— ravish jain (@ravish9370) April 10, 2025
Jaat #JaatReview
— Shivam Upadhyay (@ShivamUpad70832) April 9, 2025
One word Review:- SOLID 🔥🔥💪
👉Story : 5/5
👉 Music : 4/5
👉 Screenplay: 5/5
👉 Direction : 5/5
👉 Dialogue : 5/5
👉 Emotions : 4/5
👉 Performance : 5/5
Note : An amazing experience for Mass Audience🔥#SunnyDeol #RandeepHooda
👉 OVERALL RATING =⭐⭐⭐⭐⭐ pic.twitter.com/NzHzFMHf3l
I hardly tweet.. I m compelled today - Just attended the premiere of #Jaat — mind-blowing, paisa vasool, and pure wholesome entertainment! If you’re a fan of Ghayal, Damini, or Ghatak, this one takes it to the next level.
— Amit Joshi (@itsmeamitjoshi) April 10, 2025
Missed paying my respects to the legendary Dharmendra ji… pic.twitter.com/f9QhJml6QK
'जाट' चित्रपट झाला रिलीज : 'जाट'चं चित्रपटाची निर्मिती नवीन येरनेनी - यलमनचिली रविशंकर यांनी मैथ्री मूव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी अंतर्गत केली आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि रणदीप हुड्डा व्यतिरिक्त रेजिना कॅसांड्रा, विनीत कुमार सिंग, सैयामी खेर, स्वरूपा घोष यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. 'जाट' चित्रपटात रणदीप हुड्डा नकारात्मक भूमिकेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस चांगली कमाई करेल असं सध्या दिसत आहे. सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट आज 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता एक्स-रिव्ह्यू देखील आले आहेत. चाहतेही या चित्रपटाची तुलना सलमान खानच्या 'सिकंदर'शी करत आहेत. एका व्यक्ती एक्सवर रिव्ह्यू देताना लिहिलं,'जाट' पाहण्यासारखा चित्रपट आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हा चित्रपट गोपीचंद मालीनेनीचा पहिला हिंदी ब्लॉकबस्टर असेल.' आणखी एकानं लिहिलं, 'हे खूप धमाल असणार आहे, निदान 'सिकंदर' पेक्षा तरी ते चांगले आहे.' अनावश्यक प्रेमसंबंध नकोत, अनावश्यक गाणी नकोत. सुरुवातीपासूनच, प्रेक्षकांना फक्त तेच दाखवले जात होते, जे त्यांना पाहायचे होते. अॅक्शन आणि अॅक्शन, सनी देओल..' याशिवाय आणखी एकानं लिहिलं, 'रणदीप हुडा आणि सनी देओलच्या आगमनानं किती चांगली सुरुवात झाली, हा चित्रपट नक्कीच प्रचंड लोकप्रिय होईल.' 'जाट' चित्रपट अनेकांना आवडला आहे.
हेही वाचा :