मुंबई - मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेत आहे, कारण तिचे बरेच बहुभाषिक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सई सध्या विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असून, तिचं काम आणि प्रमोशन यामध्ये एकसारखीच चमकते आहे. सई ताम्हणकरची जोडी 'सिरीयल किसर' इमरान हाशमीबरोबर 'ग्राउंड झिरो' या हिंदी चित्रपटात जमली आहे, जो २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सईची प्रमुख भूमिका असलेला 'गुलकंद' हा चित्रपट चर्चेत असून त्यात तिची जोडी समीर चौघुले आणि प्रसाद ओकसोबत जमली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रातील जवळपास सर्वचजण या चित्रपटाशी जुळलेले आहेत. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, वनिता खरात, इशा डे, मंदार मांडवकर आदी नावे या सिनेमाशी बांधिलकी दर्शविताना दिसताहेत. 'गुलकंद' येत्या १ मे रोजी प्रदर्शित होईल.
सई ताम्हणकरची लावणी : सईच्या 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेटवर' या गाण्याची वेगळ्या कारणासाठी चर्चा आहे, ज्यातून सई तिला दिलेले 'बोल्ड ब्युटीफुल आणि बिनधास्त' हे बिरुद जस्टीफाय करते. आता तिची लावणी चर्चेचा विषय बनली आहे. 'देवमाणूस' या आगामी चित्रपटातून सई पहिल्यांदाच लावणी सादर करत आहे. आता ही लावणी सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झाली आहे.'आलेच मी' या शब्दांनी रंगलेली सईची खास अदा प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. सईनं साकारलेली ही लावणी तिच्या चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरत आहे. नऊवारी साडीत तिचा गजरा माळलेला आकर्षक लूक, लाजवाब हावभाव आणि ठसकेबाज नृत्य याने हे गाणं अधिकच आकर्षक बनलं आहे. फॅशनच्या बाबतीत ट्रेंडसेटर ठरलेली सई, आपल्या नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आता सईचं हे गाणं अनेकांना आवडत आहे.


'आलेच मी' लावणीबद्दल : अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे स्टारर 'देवमाणूस' चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मित केला आहे' हा चित्रपट पंढरीच्या वारीवर आधारित आहे. 'आलेच मी' गाणं हे बेला शेंडे, रोहन प्रधान यांनी गायलं आहे. या गाण्याला संगीत रोहन रोहन यांनी दिलंय. या लावणीसाठी सईनं खूप सराव केला होता. तसेच सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी खूप जोशपूर्ण आणि सुरेख आहे. आता सईनं या गाण्यावर दिलेली परफॉर्मन्स अनेकांना आवडत आहे. 'देवमाणूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर विठ्ठल भक्तांच्या भूमिकेत दिसणार आहे.'देवमाणूस' चित्रपटात महेश मांजरेकर व्यतिरिक्त सुबोध भावे, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या विशेष भूमिका आहेत.
हेही वाचा :