मुंबई - समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आणि बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळूनही ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित सलमान खान स्टारर 'सिकंदर' चित्रपटानं जगभरात 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनं सुरुवातीच्या अंदाजांना झुगारुन दिलं आणि पहिल्या आठवड्यातच वेग धारण केला होता.
नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटानं रिलीजच्या 9 व्या दिवशी जागतिक स्तरावर 200.93 कोटींचा गल्ला गोळा केला आहे. 'सिकंदर'नं 9 व्या दिवशी 2.48 कोटी रुपये भारतात आणि परदेशात 1 कोटींची कमाई केली. निर्मात्यांनी 200 चा आकडा पार झाल्यानंतर प्रेक्षकांचं आभार मानले आहेत. "सिकंदरला तुमच्या सेलिब्रेशनचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, " असं नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटनं म्हटलं आहे.
Thank you for making #Sikandar a part of your celebration.
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) April 8, 2025
We’re grateful for the love❤️🙌🏻
Watch #Sikandar in a theatre near you TODAY!
Book your tickets NOW! https://t.co/MTFRl0BYb0 https://t.co/HkghlbgFCU @BeingSalmanKhan In #SajidNadiadwala’s #Sikandar
Directed by… pic.twitter.com/9A44E5gIhq
ट्रेड ट्रॅकिंग साइट सॅकनिल्कनं मात्र निर्मिती संस्थेनं जाहीर केलेल्या आकड्यांपेक्षा निराळे आकडे नोंदवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 'सिकंदर'ची भारतातील एकूण कमाई अनुक्रमे 104.25 कोटी रुपये आणि 123. 65 कोटी रुपये आहे. या आकड्यांनुसार जागतिक स्तरावर 'सिकंदरची एकूण कमाई 171.65 कोटी रुपये झाली आहे. या चित्रपटाच्या कमाईची सुरुवात संथ गतीनं झाली होती आणि सोमवारी सरासरी 7.02 टक्के ऑक्युपन्सी होती हे लक्षात घेता अजूनही हा एक कौतुकास्पद आकडा मानला जात आहे.
'सिकंदर' या चित्रपटाची कमाई सलमान खानच्या आधीच्या 'टायगर ३' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांशी मिळती जुळती नसली तरी त्याच्या आधीच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटापेक्षाही चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानं जगभरात 158 कोटी रुपये कमावले होते.
'सिकंदर' हा अॅक्शन पॅक्ड ड्रामा असलेला चित्रपट आहे. सलमानबरोबरच या चित्रपटात रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, किशोर, जतिन सरना आणि संजय कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून ए.आर. मुरुगदासच्या दिग्दर्शन आणि सलमान खानच्या अभिनयाबद्दल टीका होऊनही 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर आपली ताकद सिद्ध करत आहे. मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे आणि सलमानच्या स्टार पॉवरमुळे, हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत राहण्याची शक्यता अजूनही शाबूत आहे. त्यामुळं या चित्रपटाची कमाई 300 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा निर्मात्यांना यानिमित्तानं वाटत आहे.
हेही वाचा -